मास्टर स्पोर्ट्स तायक्वांदो अकादमीला चॅम्पियनशिप

कणकवली येथे जिल्हास्तरीय स्पर्धा

तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गच्या मान्यतेने मास्टर स्पोर्ट्स तायक्वांदो आणि फिटनेस अकॅडमी आणि प्राणजीवन सहयोग संस्था शिरवलचे संस्थापक अध्यक्ष संदिप रघुनाथ चौकेकर यांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्हा चिल्ड्रेन आणि सबज्युनिअर तायक्वांदो स्पर्धा २०२५ येथील नगरवाचनालय सभागृहात झाली. यामध्ये मास्टर स्पोर्ट्स तायक्वांदो आणि फिटनेस अकॅडमी ने १८ सुवर्ण पदक, १० रौप्य पदक ,४ कास्य पदक मिळवून चॅम्पियनशिप ट्रॉफीवर आपले नाव कोरले. तसेच ११ सुवर्णपदक ,६ रौप्य पदक व २कास्य पदक मिळवून सिंधू रत्न स्पोर्ट्स अकॅडमीने द्वितीय क्रमांक पटकावला. तर चॅम्पियन स्पोर्ट्स अकॅडमीने ७ सुवर्णपदक, ४रौप्य पदक आणि ३ कास्यपदक मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. स्पर्धेचे उद्घाटन शिवसुंदर देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गचे सचिव भालचंद्र कुलकर्णी, एकनाथ धनवटे, जयश्री कसालकर,सतीश जाधव, मंदार परब, अविराज खांडेकर, ओंकार सावंत, पंच लाजरी वातकर, भाग्यश्री जाधव, प्रथमेश पावसकर, सोनिया ढेकणे, तन्वी पवार,पालक राजेश शिरवलकर आदी उपस्थित होते. तर बक्षीस वितरण समारंभ नगरसेविका मेघा सावंत, प्रशांत गावडे, मिलिंद पाटील, रावराणे याच्या उपस्थितीत झाला. या स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे आहे. चिल्ड्रेन मुले – १६ किलो खालील हर्ष कसालकर- प्रथम, १८ किलो खालील प्रज्ञेश बालम प्रथम क्रमांक, रुद्र जाधव द्वितीय क्रमांक, हर्ष धनवटे तृतीय क्रमांक. २० किलो खालील शौर्य भागवत प्रथम क्रमांक, २२ किलो खालील शिवांश राणे -प्रथम क्रमांक, २४ किलो खालील सार्थक माने प्रथम क्रमांक, कार्तिक रावराणे द्वितीय क्रमांक, रुद्र राऊळ तृतीय क्रमांक, २६ किलो खालील साई गुरव प्रथम क्रमांक, समर्थ जाधव द्वितीय क्रमांक, ३२ किलो खालील ईहान पेडणेकर प्रथम क्रमांक, ३६ किलो खालील अथर्व राणे प्रथम क्रमांक,चिल्ड्रेन मुली- १६ किलो खालील आर्या म्हसकर प्रथम क्रमांक, मंदिरा जाधव द्वितीय क्रमांक. १८ किलो खालील सोनल खंदारे प्रथम क्रमांक, राधा कामत द्वितीय क्रमांक, २० किलो खालील अद्विका पाटील प्रथम क्रमांक, मुग्धा गावडे द्वितीय क्रमांक. २२ किलो खालील आर्वी राऊळ प्रथम क्रमांक, काजल गांधारी द्वितीय क्रमांक. जिजा कदम तृतीय क्रमांक.२४ किलो खालील दक्षा पडेलकर प्रथम क्रमांक २६ किलो खालील भाग्यश्री पुजारे- प्रथम क्रमांक. ३२ किलो खालील मंत्रा पांचाळ प्रथम क्रमांक. ३२ किलो वरील अवनी मालपेकर प्रथम क्रमांक. सबज्युनिअर मुले- २१ किलो खालील ओम टाकळे प्रथम क्रमांक, गंगाधर चव्हाण द्वितीय क्रमांक, २३ किलो खालील दिवेश तेंडुलकर प्रथम क्रमांक, अदनान काझी द्वितीय क्रमांक, आराध्य रावराणे तृतीय क्रमांक, २५ किलो खालील पियुष परुळेकर प्रथम क्रमांक, समर्थ जाधव द्वितीय क्रमांक. २७ किलो खाली रुन्मय शिरवलकर प्रथम क्रमांक, शिवम राणे द्वितीय क्रमांक, २९ किलो खाली हर्षण अडुळकर प्रथम क्रमांक, वेद जाधव द्वितीय क्रमांक, हर्षित कणसे, सार्थ सावंत दोघे तृतीय क्रमांक, ३२ किलो खालील वेद कदम प्रथम क्रमांक, जय घेराडे द्वितीय क्रमांक, कौशल राऊत आणि दिव्यांश जाधव तृतीय क्रमांक. ३५ किलो खाली कौशिक आबदार प्रथम क्रमांक, रेयांश सावकार द्वितीय क्रमांक, ३८ किलो खाली. आराध्य सावंत प्रथम क्रमांक, जोहान फर्नांडिस द्वितीय क्रमांक. ४१ किलो खाली गौरेश तेली प्रथम क्रमांक. किलो खाली शास्वत गाठे प्रथम क्रमांक, अर्णव राणे द्वितीय क्रमांक, ५० कि खाली शौर्य भोवड प्रथम क्रमांक, गंदर्व प्रभू द्वितीय क्रमांक, ५० किलोवरील प्रद्युम्न मुळदेकर प्रथम क्रमांक, कृष्णा बंडागळे द्वितीय क्रमांक. सबज्युनिअर मुली- २० किलो खाली हसरी आंगणे प्रथम क्रमांक, २२किलोखाली श्रीरक्षा पुजारे प्रथम क्रमांक, साक्षी म्हस्कर द्वितीय, २४किलोखाली आयुषी गुरव प्रथम क्रमांक, काव्या सावंत द्वितीय क्रमांक, २६ किलो खाली आद्या चौगुले प्रथम क्रमांक, अक्षरा साटम द्वितीय क्रमांक, आराध्या सबनीस आणि अन्वी राणे तृतीय क्रमांक, २९किलो खाली योजना सुतार प्रथम क्रमांक, अक्षरा जोपळे द्वितीय क्रमांक, रुही पवार तृतीय क्रमांक, ३२किलो खाली ईशानी रावराणे प्रथम क्रमांक, चार्वी कोरगावकर द्वितीय क्रमांक. ३४ किलो खाली नंदिनी दयाळकर प्रथम क्रमांक, ३८ किलोखाली हितिका नारकर प्रथम क्रमांक, ४१ किलो खाली गायत्री परब प्रथम क्रमांक, ४७ किलो खाली नभा गोवळकर प्रथम क्रमांक ४७ किलो वरील वीरा रासम प्रथम क्रमांक. या खेळाडूंनी यश मिळवले. यातील प्रथम क्रमांक प्राप्त सब ज्युनिअर मुले व मुलींची राज्यस्तरीय स्पर्धा कुडाळ येथे होणार आहे. फोटो ओळ – कणकवली येथे सिंधुदुर्ग जिल्हा चिल्ड्रेन आणि सबज्युनिअर तायक्वांदो स्पर्धा झाली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते चॅम्पियनशिप चषक मास्टरस्पोर्ट्स तायक्वांदो आणि फिटनेस अकॅडमीच्या खेळाडूना देण्यात आला .यावेळी भालचंद्र कुळकर्णी, एकनाथ धनवटे, मंदार परब आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!