माड्याचीवाडी चेकपोस्ट जवळ कार आणि रिक्षामध्ये अपघात

पिंगुळी – पाट मार्गावरील माड्याचीवाडी चेकपोस्ट जवळ चार चाकी कार आणि रिक्षा यांच्यात अपघात झाला. समोरून अंतर्गत रस्त्याने आलेल्या कारची पाटच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक बसली. यात रिक्षा रस्त्यावर पलटी झाली. हा अपघात आज (गुरूवारी) दुपारी ३ वाजताच्या सुमारास झाला. रिक्षातील तीघांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर कुडाळ येथील रूग्णालयात उपचार करण्यात आले. अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाल्याचे समजते. स्थानिक ग्रामस्थांची घटनास्थळी गर्दी झाली होती.





