कलमठ मध्ये समृद्ध पंचायत महोत्सवाचा स्वच्छता मोहिमेने शुभारंभ

समृद्ध पंचायत महोत्सव अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन

30 डिसेंबर रोजी होणार विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण

मुख्यमंत्री पंचायत राज अभियाना च्या माध्यमातून समृद्ध पंचायतराज महोत्सव या उपक्रमांतर्गत स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करत कणकवली आचरा मार्गावर लक्ष्मी चित्रमंदिर ते कलमठ बाजारपेठ पर्यंत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभागी होत स्वच्छता मोहीम यशस्वी केली., या महोत्सवा अंतर्गत 25 ते 29 डिसेंबर पर्यंत स्वच्छ वाडी स्वच्छ संकुल ही कलमठ गाव मर्यादित स्पर्धा, 26 डिसेंबर रोजी पोलीस स्टेशन समोर प्रबोधन पर पथनाट्य, 28 डिसेंबर रोजी स्मशानभूमी स्वच्छता, 29 डिसेंबर रोजी सार्वजनिक विहीर शुद्धीकरण करणे, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविणे शालेय गट, तर या सर्व स्पर्धांचा बक्षीस वितरण व प्रबोधन पर फुगडी स्पर्धेचे आयोजन 30 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता कलमठ ग्रामपंचायत या ठिकाणी करण्यात आले आहे.
यावेळी सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच दिनेश गोठणकर, महेश लाड, ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर , स्वप्नील चिंदरकर, नितीन पवार, अनुप वारंग, सुप्रिया मेस्त्री, स्वाती नारकर, श्रेयस चिंदरकर, गुरु वर्देकर, स्वरूप कोरगावकर आबा कोरगावकर, तेजस लोकरे, विलास गुडेकर, पप्पू कोरगावकर, ओंकार मेस्त्री, दिनार लाड, अक्षता करंजेकर, पूजा हुन्नरे, विभावरी कांबळे, सान्वी कुडाळकर, अक्षता लाड, प्राची पवार, शर्मिला चव्हाण, राजश्री शिर्के, सुनीता पाटकर, सुलभा कदम, रत्नावली लाड, शुभांगी सावंत, रूपेश कदम, मंगेश कदम, आरती गुरव, गणेश सावंत, अण्णा सावंत, ज्योती आमदोसकर, अंकिता राणे, नमिता मठकर, रमेश चव्हाण, मनोज घाडी, गौरव तांबे, मोहन तांबे ग्रामस्थ मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते.

error: Content is protected !!