पिंगुळीत महिलेचे मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न

परजिल्ह्यातील दोघांना ग्रामस्थांचा ‘प्रसाद’
कुडाळ तालुक्यात पिंगुळी येथे एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून पलायन करणाऱ्या परजिल्ह्यातील दोघांना स्थानिक ग्रामस्थांनी पकडले. त्यानंतर त्यांना चांगलाच प्रसाद देत कुडाळ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. हि घटना आज दुपारी घडली.
पिंगुळी भूपकरवाडी नजिक रस्त्याने चालणा-या एकाला महिलेला मोटरसायकल वरून आलेल्या दोन जणांनी ओळखीचा बहाणा करीत तिला परिसरातील लोकांच्या नावांची ओळख सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचदरम्यान मोटरसायकल वरील एकाने त्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या महिलेने प्रसंगावधान दाखवल्याने अनर्थ टळला. त्यानंतर दोघेही इसम मोटारसायकलने पळून गेले. याबाबतची माहीती मिळताच ग्रामस्थांनी त्यांना पकडले. त्यानंतर त्यांना कुडाळ पोलिसांच्या ताब्यात दिले.





