सप्तशक्ति संगम कार्यक्रमाचे आयोजन

सुशीला शिशुवाटिका, हिंदू कॉलनी कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न

संघशताब्दीपूर्ती निमित्त विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्थानने आयोजित केलेला सप्तशक्ति संगम हा कार्यक्रम दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी विद्याभारती कोकण प्रांत, सिंधुदुर्ग जिल्हा आणि सुशीला शिशुवाटिका, हिंदू कॉलनी कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला.
‘नवयुग का नवविचार’ या गीताने सौ. सिद्धी सहस्रबुद्धे यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. त्याला तबल्यासाठी कुमारी सावंत तर पेटीसाठी हेतल देसाई या शिशु वाटिकेच्या दोन माजी विद्यार्थिनीनी साथ केली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले. शिशु वाटिकेच्या सर्व दीदींनी दीपमंत्र व वंदना म्हटली.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. सई राणे, वक्त्या स्नेहा फणसळकर यांचा परिचय, प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन मीरा परब यांनी केले.
‘कुटुंब प्रबोधन आणि पर्यावरण’ याविषयी स्नेहा फणसळकर यांनी माता पालकांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी कुटुंबाच्या बदलत्या व्याख्येत आपण महिला म्हणून काय करू शकतो आणि कुटुंब एकत्र कसे बांधू शकतो याविषयी तसेच पर्यावरण पूरक जीवनशैली कशी स्वीकारू शकतो याविषयी प्रोत्साहित केले.
त्यानंतर शाळेच्या पालक सोनल सागर घोघारी यांनी भूमाता, अलीशा पाटकर यांनी जिजाबाई आणि तनुश्री मराठे हिने कुटुंब या विषयावर वेशभूषा साकार केली. त्यानंतर कविता कुंटे यांनी काही खेळ घेऊन , प्रश्न विचारले आणि पालकांशी संवाद साधला. त्यांनी करणीय अशा गोष्टी या खेळातून त्यांच्यापर्यंत पोचवल्या.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दिव्यांग असूनही कणखरपणे उभ्या राहून आपल्या कष्टाने संसाराचा गाडा चालवणाऱ्या सायली कुंभार, आपल्या सहकारी मैत्रिणींना सोबत घेऊन समाजकार्य करणाऱ्या स्नेहांकिता माने आणि अनेक देवळांमध्ये जाऊन सनातन धर्माचा प्रचार करणाऱ्या सुषमा गोवेकर या तीन माता पालकांचा सन्मान करण्यात आला. तेव्हा त्यांना सन्मानपत्र, पुस्तक व औषधी असणारे कोरफड रोप देण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. सई राणे यांनी अशा कार्यक्रमांची गरज का आहे आणि वारंवार असे कार्यक्रम झाले पाहिजेत असे मत व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमाचे संपूर्ण छायाचित्रण जागृती वाटवे यांनी केले
त्यानंतर ॲड.मेघा संदीप परब.
सौ. प्राची विजय तुडयेकर या दोन पालकांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सांगता सर्व माता पालकांनी कुटुंब, समाज, राष्ट्र आणि विश्वकल्याणासाठी काम करण्याचा, तसेच स्वतःमधील सप्तशक्ति जागृत करण्याचा संकल्प करून केला.

विद्यानिकेतन स्कूल, कसाल, सिंधुदुर्ग
दिनांक: ७ डिसेंबर २०२५
कुटुंब प्रबोधन आणि पर्यावरण या विषयावर डॉ. दर्शना कोलते यांनी मार्गदर्शन केले. सप्तशक्ती आणि भवन – भोजन – भाषा – भूषा – भजन – भ्रमण यांच्या आयामातून कुटुंबाचा विकास आपण महिला म्हणून कसा करू शकतो याविषयी चर्चा केली.
त्यानंतर शाळेतील शिक्षिकानी दोन छोट्या नाटुकल्यांच्या माध्यमातून कुटुंब व स्त्रीभ्रूणहत्या हे विषय पालकांसमोर मांडले. त्यानंतर त्यावर प्रश्न विचारून पालकांना बोलते केले. सिंधुताई सपकाळ यांची वेशभूषा साकार करत यांनी भारताच्या विकासात महिलांचे योगदान हा विषय सादर केला.
त्यानंतर अतिशय कष्टाने आपल्या कुटुंबाला ऊर्जितावस्था प्राप्त करून देणाऱ्या आशालता राऊळ आणि संजना बागवे या दोन मातापालकांचा सन्मान करण्यात आला. डॉ. सुशांता कुलकर्णी व सौ. जोगळेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात निवृत्त शिक्षिका श्रीमती स्वप्नगंधा नाईक यांनी या कार्यक्रमाविषयी अत्यंत कौतुकाचे उद्गार काढले. अशा कार्यक्रमांमधूनच समाजाप्रती आपली असलेली बांधिलकी आपल्या लक्षात येते असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाची सांगता सर्व माता पालकांनी कुटुंब, समाज, राष्ट्र आणि विश्वकल्याणासाठी काम करण्याचा, तसेच स्वतःमधील सप्तशक्ति जागृत करण्याचा संकल्प करून केला.

error: Content is protected !!