संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे रोबोटिक्स मध्ये घवघवीत यश

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर येथील विद्यार्थ्यांनी Inventra 2025 – महाराष्ट्रातील सर्वात मोठी राज्यस्तरीय रोबोटिक्स स्पर्धा व प्रकल्प प्रदर्शन या स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले. ही स्पर्धा शुक्रवार, दि. 12 डिसेंबर 2025 रोजी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील दीक्षांत सभागृहात पार पडली.

लोकमत आणि रोबोस्टॉर्म्स टेक्नॉलॉजी प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली गेली होती. या प्रतिष्ठित स्पर्धेत महाराष्ट्रभरातील नवोदित संशोधक विद्यार्थ्यांनी रोबोटिक्स व आधुनिक तंत्रज्ञानातील आपले कौशल्य सादर केले.

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल मधील बोर्डिंग विभागातील विद्यार्थी संस्कृती लांबटे व विश्वजीत शिंदे यांनी सादर केलेल्या “ThirdEye” या अभिनव प्रकल्पाने परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. हा कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित प्रकल्प शेतकऱ्यांच्या शेतात होणाऱ्या वन्य प्राण्यांच्या घुसखोरीचा शोध घेऊन स्वयंचलित मोठ्या आवाजाच्या इशाऱ्याद्वारे त्यांना दूर पळविण्यास मदत करतो.
कृषी भविष्य या राष्ट्रीय प्राधान्य विषयाशी सुसंगत असलेल्या प्रोजेक्ट एक्स्पो विभागात सादर झालेल्या एकूण 45 प्रकल्पांमधून संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावत ₹4,000 रोख पारितोषिक व आकर्षक चषक मिळवला.
ही स्पर्धा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली. यामध्ये श्री. सरदार जाधव, प्राचार्य, डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूल, पेठवडगाव; श्री. गणेश नायकुडे, संस्थापक–अध्यक्ष, गुरुकुल स्कूल्स, इचलकरंजी व अध्यक्ष, इंग्लिश मीडियम स्कूल्स असोसिएशन, महाराष्ट्र; श्री. तेज घाटगे, व्यवस्थापकीय संचालक, माय हुंडाई; सौ. पल्लवी कोरगावकर, अध्यक्षा, कोरगावकर ग्रुप; श्री. प्रदीप करांडे, अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर आणि श्री. निलेश कुट्टे, सचिव, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर हे मान्यवर उपस्थित होते.

या विद्यार्थ्यांना शिक्षक श्री. संतोष हिरेमठ व सौ. साक्षी चौगुले यांनी तांत्रिक मार्गदर्शन व शैक्षणिक सहकार्य केले.
या यशाबद्दल अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त श्री. विनायक भोसले, संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती, प्राचार्य डॉ. नवीन महाबळेश्वर, उपप्राचार्या सौ. शोभा नवीन यांनी मार्गदर्शक शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

error: Content is protected !!