केंद्रस्तरीय व प्रभाग स्तरीय बाल, कला, क्रीडा स्पर्धेमध्ये साकेडी शाळेचे घवघवीत यश

विविध गटातील स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मारली बाजी
जानवली केंद्रस्तरीय बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव मध्ये जिल्हा परिषद शाळा सरस्वती विद्या मंदिर साकेडी नंबर 1 च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. साकेडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या या दैदिप्यमान कामगिरीबद्दल त्यांचे ग्रामस्थ व शिक्षकांकडून देखील अभिनंदन करण्यात आले आहे. स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे – 50 मीटर धावणे मुलगे एलीस्टर दुुमिंग म्हापसेकर प्रथम, जॉ्येन डॉमिनिक फर्नांडिस द्वितीय, 50 मीटर धावणे मुली हृदयी प्रशांत जाधव द्वितीय, 100 मीटर धावणे मुलगे
दर्शन तुकाराम ढवण द्वितीय, 100 मीटर धावणे मुली दुर्गा चंद्रकांत घाडीगावकर प्रथम, लांब उडी मुली, मनस्वी सुनील राणे द्वितीय, उंच उडी मुलगे संजय पिंट्या निकम प्रथम, एलीस्टर दुुमिंग म्हापसेकर द्वितीय
उंच उडी मुली दुर्गा चंद्रकांत घाडीगावकर प्रथम रिले
50*4 रिले मुली प्रथम क्रमांक कबड्डी मुलगे विजेता,
कबड्डी मुली विजेता, खो खो मुलगे विजेता, समूह गान उपविजता समूह नृत्य उपविजेता मोठा गट 100 मीटर धावणे मुली सानवी समीर परब प्रथम, लांब उडी मुली मरियम अझरुद्दीन शेख द्वितीय, उंच उडी मुलगे
सर्वेश सागर गुरव प्रथम, गोळा फेक मुलगे,
सर्वेश सागर गुरव प्रथम, गोळा फेक मुली झीनत नासिर शेख प्रथम, कबड्डी मुलगे विजेता कबड्डी, मुली विजेता, खो खो मुलगे विजेता खो खो, मुली विजेता, ज्ञानी मी होणार प्रथम. तसेच साकेडी शाळेने प्रभाग स्तरीय क्रिडा स्पर्धेत घवघवीत यश मिळविले असून, बिडवाडी हायस्कूल मैदान दणाणून टाकले. खोखो मोठा गट मुलगे विजयी, कब्बडी लहान गट मुलगे विजयी, गोळा फेक सर्वेश प्रथम, जीनत गोळा फेक द्वितीय, संजय निकम उंच उडी द्वितीय, एलिस्टर उंच उडी तृतीय, उंच उडी सर्वेश द्वितीय, ऍलिस्टर धावणे द्वितीय असे यश मिळवले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक शिक्षक व पालकांनी अभिनंदन केले आहे.





