कोंडये येथील नंदु तिरोडकर यांचे निधन

कणकवली तालुक्यातील कोंडये येथील रहिवासी नंदकिशोर उर्फ नंदू वसंत तिरोडकर (68) यांचे रविवारी 2 नोव्हेंबर रोजी अल्पशा आजाराने मुंबई येथे निधन झाले. गेले काही दिवस त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर मुबई येथे उपचार सुरू होते. याच दरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन विवाहित मुली, नातवंडे, जावई, भाऊ, भावजय असा मोठा परिवार आहे. कोंडये येथील सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक उपक्रमात त्यांचा नेहमी हिरहिरीने सहभाग असे. कृषी विषयक कामात त्यांना विशेष आवड होती. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. त्यांच्यावर कोंडये येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
कणकवली प्रतिनिधी





