पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून खारेपाटण हायवे ते वायंगणीकडे जाणाऱ्या रस्तादुरुस्ती व डांबरीकरणसाठी १कोटी निधी मंजूर

ग्रामस्थांनी मानले पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार

रस्ता दुरुस्ती करिता रमाकांत राऊत यांनी केला पालकमंत्री राणे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा

महाराष्ट्र शासनाच्या सन २०२६-२७ च्या आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण जिल्हा परिषद मतदारसंघातील महत्त्वाच्या प्रजिमा १ खारेपाटण हायवे ते वायंगणी कडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्ती व डांबरीकरण कामासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे स्थानिक स्तरावरून आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

खारेपाटण – वायंगणी – कोर्ले – धालवली – पोंभुर्ले या मार्गावरील प्रजिमा-१ अंतर्गत रस्ता डांबरीकरणासाठी सुमारे १ कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आला आहे. सदर रस्ता परिसरातील नागरिक, शालेय विद्यार्थी तसेच अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून रस्त्याची अवस्था खराब झालेली होती. त्यामुळे या कामासाठी अर्थसंकल्पात निधी मंजूर होणे ही स्थानिक नागरिकांसाठी दिलासादायक बाब ठरली आहे.

या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते रमाकांत राऊत यांचे सरपंच अस्मि प्रशांत लाड, उपसरपंच -प्रताप फाटक, सर्व सदस्य व स्थानिक ग्रामस्थांनी विशेष आभार मानले आहेत. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी अर्थसंकल्पात निधी मंजूर करून विकासकामांना गती दिल्याबद्दल मंत्री ना. नितेश राणे यांचेही मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

सदर रस्त्याच्या कामामुळे परिसरातील वाहतूक अधिक सुरक्षित व सुलभ होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

error: Content is protected !!