जेष्ठ रंगकर्मी रघूनाथ कदम यांच्या शोकसभेचे कणकवलीत 1 नोव्हेंबर रोजी आयोजन

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान या ठिकाणी होणार शोकसभा

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली च्या वतीने जेष्ठ रंगकर्मी रघूनाथ कदम यांच्या शोकसभेचे
शनिवारी दिनांक ०१ नोव्हेंबर २०२५ रोजी ठिक ५:०० संस्थेच्या नाटय घरात करण्यात आले आहे.
गेली ४५वर्षे नाट्य क्षेत्रात काम करीत असलेले एक नाट्यकर्मी यांचे अचानक निधन झाले. गेली दोन दशके सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाट्यचळवीत त्यांचा मोठा सहभाग होता. एका़ंकीका नाटक दिर्घांक असे आणखी अनेक नाट्य प्रकारातील प्रयोगाचे दिग्दर्शन अभिनय केला आहे. आजच्या तरूण पिढीतील कलाकारांचे एक ‘रघूकाका नावाचे चालते बोलते स्कूल आता कायमचे बंद झाले. त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम केलेल्या कलाकारांना आणि रघूकाका प्रेमी मित्रमंडळी यांना त्यांच्याप्रति असलेल्या भावना आठवणी अनुभव व्यक्त करण्याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
सर्व नाट्य प्रेमी रसिक आणि कलाकार मित्रमंडळी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!