कणकवलीत सावरकर गौरव यात्रेनिमित्त सादर होणार क्रांती गीते, पोवाडे व अन्य कार्यक्रम

आमदार नितेश राणेंच्या संकल्पनेतून यात्रा यशस्वी होण्यासाठी जोरदार तयारी

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सन्मानार्थ संपूर्ण महाराष्ट्रात सावरकर गौरव यात्रा सुरू आहे. या यात्रेचे आगमन बुधवार दिनांक 5 एप्रिल रोजी सायंकाळी 4:00 वाजता कणकवली शहरात होत आहे. या यात्रेचे भव्य स्वागत आमदार नितेशजी राणे करणार आहेत. या यात्रेचा भव्य दिव्य स्वागत समारंभ आमदार नितेशजी राणे यांनी योजला आहे. या स्वागत समारंभात सावरकर दर्शन प्रतिष्ठान मुंबई या संस्थेच्या सहकार्याने भव्य रंगमंचावर सावरकर लिखीत पोवाडे, छत्रपती शिवाजी महाराजांची आरती, क्रांती गीते, हिंदु गौरव गीते यावर आधारित “सावरकर गौरव ” हा कार्यक्रम कणकवली शिवाजी चौक येथे सादर होणार आहे. सावरकर प्रतिष्ठान चे नामवंत कलाकार हा कार्यक्रम सादर करतील. सावरकरांचे राष्ट्रवादी विचार, हिंदु तत्वज्ञान घरा घरात पोहचावे म्हणून आमदार नितेशजी राणे जोरदार प्रयत्न करत आहेत.या सावरकर गौरव यात्रेत सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे अवाहन आमदार नितेश राणे यांनी केले आहे.


कणकवली / प्रतिनिधी

error: Content is protected !!