खारेपाटण येथे प्रथमच दिवाळी बाजार ; शिवसेना पक्षाकडून आयोजन

दिवाळी निमित्त बचतगट उत्पादने प्रदर्शन व विक्री
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी शिवसेना तालुका प्रमुख मंगेश गुरव यांनी केले आवाहन
खारेपाटण विभागातील बचतगट व छोटे व्यावसायिक / उद्योजक यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना कणकवली तालुक्याच्या वतीने खारेपाटण येथे पहिल्यांदाच दिवाळी बाजार सुरु होणार आहे. दिनांक 15 ते 22 ऑक्टोबर पर्यंत आयोजित या बाजारा मध्ये दिवाळी साहित्य, फराळ, आकाशकंदील, पणत्या, रांगोळी, अशा विविध वस्तू आपल्या गटा मार्फत विकण्याची सुवर्ण संधी महिला बचत गटांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी या मध्ये आपला स्टॉल लावण्यासाठी आजच संपर्क करा, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य, मर्यादित स्टॉल आहेत तरी आपले नाव आजच नोंदवा असे आवाहन शिवसेना तालुका प्रमुख श्री. मंगेश गुरव यांनी केले आहे.
तसेच सर्व ग्राहकांना एकच छताखाली दिवाळीची खरेदी करण्याचा आनंद घेण्यासाठी कुटुंबासह अवश्य भेट द्यावी असेही श्री. गुरव यांनी म्हटले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
श्री. मंगेश गुरव 9422433760
श्री. सुहास राऊत 9595712121
सौ आस्था पाटणकर 9325327693.





