पिंगुळी – साई मंदिर येथे एसटी बसची कारला मागून धडक

पुढील तपास कुडाळ पोलिसांकडून सुरू

मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ येथील साई मंदिर, पिंगुळी येथे एसटी बसने एका कारला मागून धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही गंभीर दुखापत झाल्याची माहिती अद्याप हाती आलेली नाही. परंतु दोन्ही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा सुरू केला. या अपघातामागचे नेमके कारण काय होते, याबाबत कुडाळ पोलीस अधिक तपास करत आहेत.

error: Content is protected !!