संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमधील विद्यार्थ्यांची रंगोत्सवातील विविध स्पर्धांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर घे भरारी

राष्ट्रस्तरीय चित्रकला स्पर्धा मुंबई, महाराष्ट्र संचालित रंगोत्सव महोत्सवाअंतर्गत आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धा नुकत्याच पार पडल्या.या विविध स्पर्धांमध्ये संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमधील एकूण 12 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या महोत्सवाअंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यात हस्ताक्षर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, टॅटू बनवणे, कार्टून बनविणे,चित्र रेखाटणे,फिंगर अँड थम पेंटिग,कोलाज व भेटकार्ड बनविणे अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या विविध स्पर्धांमध्ये प्रशालेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त करत प्रशालेचे नाव यशाच्या उंच शिखरावर पोहचवले आहे.

इयत्ता चौथीत शिकणाऱ्या कु. वैष्णवी विश्राम धर्णे या विद्यार्थिनीने हस्ताक्षर स्पर्धेत संपूर्ण भारतात तिसरा क्रमांक पटकावत प्रशालेच्या नावात मानाचा तुरा रोवला आहे.तसेच इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या कु.प्रतिक सुनिल जाधव याने रंगभरण स्पर्धेत व इयत्ता दहावीत शिकणाऱ्या कु. दिव्यांक केशव परब याने चित्रकला स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करीत चषक पटकावले. तसेच पुढील विद्यार्थ्यांनी विविध पदकांवर आपली नावे कोरली.उदयोन्मुख युवा कलाकार पारितोषिक कु.रघुनाथ गोविंद मठकर- इयत्ता 10वी (रंगभरण स्पर्धा) कु.विघ्नेश जयराम नाईक – इयत्ता 4थी ( रंगभरण स्पर्धा)
कु.आदया अजित नाईक – इयत्ता 9वी (हस्ताक्षर स्पर्धा)
कु.पूर्वा महादेव गावकर – इयत्ता 6वी (हस्ताक्षर स्पर्धा)
कु.मयुरेश अनिल कदम – इयत्ता 5वी (हस्ताक्षर स्पर्धा)
कु.गावडे कीर्ती काशिराम इयत्ता 9वी (कार्टून बनवणे स्पर्धा)
कु. गार्गी प्रकाश वराडकर – इयत्ता 9वी (कार्टून बनवणे स्पर्धा)
उत्तेजनार्थ पारितोषिक कु.नैतिक उमेश माळकर – इयत्ता 4थी (फिंगर अँड थम पेंटिग)
कु.दिपेश दत्तप्रसाद परब – इयत्ता 8वी (टॅटू काढणे स्पर्धा)
विद्यार्थ्यांना या विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रेरणा व मार्गदर्शन करण्याचे कार्य प्रशालेतील सहायक शिक्षिका श्रीमती.संध्या पवार मॅडम व श्रीमती. प्रियांका शिरसाठ मॅडम यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल रंगोत्सव महोत्सव संस्थेमार्फत प्रशालेला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कमिटी सदस्या भारती मॅडम,रोहित कुलकर्णी सर, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. गजानन पालयेकर सर ,उपमुख्याध्यापक श्री. हेमंत तानावडे सर,सर्व शिक्षक वृंद या सर्वांचे सहकार्य व मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले होते.
कमिटी सदस्या भारती मॅडम,रोहित कुलकर्णी सर, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. गजानन पालयेकर सर ,उपमुख्याध्यापक श्री. हेमंत तानावडे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थांचे कौतुक केले.
संस्थेचे चेअरमन डॉ. शेखर जैन सर यांनी विद्यार्थांच्या सर्वांगिण विकासात त्यांच्या अंगी असणारे सुप्त गुण ओळखणे आवश्यक आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू. अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त करून सर्व यशस्वी विद्यार्थांचे कौतुक केले.

सावंतवाडी / प्रतिनिधि

error: Content is protected !!