व्हिक्टर डॉन्टस लॉ कॉलेजमध्ये मानसिक आरोग्य दिन साजरा

दिवाणी न्यायालय, तालुका विधिसेवा समिती आणि वकील संघटनेचे आयोजन

कुडाळ : येथील दिवाणी न्यायालय, कुडाळ तथा तालुका विधी सेवा समिती कुडाळ व वकील संघटना कुडाळ यांच्या सयुक्त विदयमाने व्हीक्टर डॉन्टस लॉ कॉलेज कुडाळ येथे जागतीक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मानसिक आरोग्य याविषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
व्हिक्टर डॉन्टस लॉ कॉलेज कुडाळचे संस्थापक व्हिटर डॉन्टस यांच्या अध्यक्षेतेखाली हा कार्यक्रम झाला. व्हिक्टर डॉन्टस यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा महिला व बाल रुग्णालय सिंधुदुर्ग कुडाळ येथील वैदयकिय अधिकारी डॉ. सुशांता कुलकर्णी, वकील संजय रानडे, व्हिक्टर डॉन्टस लॉ कॉलेज कुडाळच्या प्राचार्य डॉ शिल्पा मर्गज, दिवाणी न्यायालयातील वरिष्ठ लिपिक आर. टी. आरेकर उपस्थित होते.
वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांता कुलकर्णी यांनी ‘मानसिक आरोग्य’ या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच वकील संजय रानडे यांनी ‘बालकांचे लैंगिक अत्याचारापासुन संरक्षण अधिनियम’ या विषयावर मार्गदर्शन केले. व्हिक्टर डॉन्टस लॉ कॉलेजच्या प्राचार्य डॉ शिल्पा मर्गज यांनी विदयार्थ्यांना ‘जागतीक मानसिक आरोग्य दिना’बाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व्हीक्टर डॉन्टस लॉ कॉलेज कुडाळची विदयार्थीनी कु. प्रणिता परब यांनी केले. व्हीक्टर डॉन्टस लॉ कॉलेज कुडाळच्या प्रा. श्रीमती माळकर यांनी सर्वाचे आभार मानले. विदयार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन दिवाणी न्यायालय कुडाळ येथील कर्मचारी वरीष्ठ लिपीक आर. टी. आरेकर व शिपाई एम. एस. प्रभु यांनी केले.

error: Content is protected !!