कुडाळ मध्ये ‘आम्ही आत्मनिर्भर’ महोत्सवाचा शुभारंभ

नर्मदाआई संस्थेच्या वतीने आयोजन
१२ ऑक्टोबरला होणार सांगता
दीपावलीचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वतः व्यवसाय करणाऱ्या आत्मनिर्भर उद्योजकांना एका छताखाली एकत्र करुन त्यांच्या व्यवसायाला आणखी बळ देण्यासाठी नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या वतीने कुडाळच्या महालक्ष्मी हॉल मध्ये ‘आम्ही आत्मनिर्भर’ महोत्सवाच आयोजन करण्यात आल आहे. या महोत्सवाचं उदघाटन महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार विजेती अभिनेत्री श्रद्धा प्रसाद खानोलकर आणि अभिनेत्री तथा इन्फ्लुएन्सर रुचिता शिर्के यांच्या हस्ते फित कापून आणि दीप प्रज्वलन करून शुक्रवारी सकाळी झालं.
हा महोत्सव गेली ५ वर्षे सातत्याने राबविण्यात येत आहे. यंदाचा हा नववा महोत्सव आहे. या महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी अभिनेत्री श्रद्धा खानोलकर, इन्फ्लूएंसार रुचिता शिर्के, नगरसेविका ज्योती जळवी, नर्मदाआई संस्थेच्या अध्यक्षा संध्या तेरसे, सचिव दीप्ती मोरे, संचालक जान्हवी मोरे, प्राजक्ता तेरसे, प्रथमा तेरसे, प्रार्थना तेरसे, साधना माडये उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांचं स्वागत संध्या तेरसे यांनी यांनी केलं. तसंच प्रास्ताविकातून संध्या तेरसे यांनी या उपक्रमाबद्दल माहिती देऊन सर्व स्टॉल्स धारकांचं स्वागत केलं. प्रमुख अतिथी श्रद्धा खानोलकर आणि रुचिता शिर्के यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
दीपावलीच्या यानिमित्ताने होणाऱ्या या महोत्सवात एकूण ४४ प्रकारचे स्टॉल्स मांडण्यात आले आहेत. या अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून इथल्या व्यावसायिकांना आत्मनिर्भर करण्याचा आणि त्या अनुशंघाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर अभियानाला बळकटी देण्याचा हा प्रयत्न असल्याचं नर्मदाआई संस्थेच्या अध्यक्षा संध्या तेरसे यांनी सांगितलं.
आम्ही आत्मनिर्भर महोत्सवाच्या निमित्ताने स्वदेशीचा नारा देण्यात आला आहे. येणाऱ्या प्रत्येकाकडून इथं एक फॉर्म भरून घेण्यात आला आणि त्यांना स्वदेशी मोहिमेत सहभागी करून घेण्यात आलं. उदघाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन दीप्ती मोरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रथमा तेरसे यांनी केलं. या ठिकाणी एक सेल्फी पॉईंट देखील उभारण्यात आला आहे. १२ ऑक्टोबर पर्यंत तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला जास्तीतजास्त ग्राहकांनी भेट द्यावी आणि जिल्ह्यातील व्यावसायिकांना आत्मनिर्भर बनण्यास हातभार लावावा अस आवाहन नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्था, कुडाळच्या माध्यमातून करण्यात आलं आहे.





