कणकवली फोंडा व फोंडाघाट वैभववाडी राज्य मार्गावर खड्डे बुजवण्यास सुरुवात

कणकवली-फोंडा व फोंडा- वैभववाडी मार्गावर पडलेले खड्डे बुजवण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावती सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी फोंडाघाट वासियाने खड्डे न बुजवल्यास उपोषणाचा इशारा दिला होता. याच घटनेची दखल पालकमंत्री नीतेश राणे यांनी घेत तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाला खड्डे भरण्याच्या सूचना दिल्या होत्या. कणकवली कार्यकारी अभियंता दिनेश बागुल यांनी तातडीने हुंबरठ फोंडा रस्त्याला वळणावरच तीन ते चार फुटाचा मोठा खड्डा पडला होता तो तातडीने बुजविण्यात आला. तसेच फोंडा वैभववाडी राज्य मार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम देखील सुरुवात करण्यात आली आहे.





