टाकेवाडी अंगणवाडी येथे शिवसेनेच्या माध्यमातून टीव्ही,लाईट, ऍक्वागार्ड प्रदान

खारेपाटण टाकेवाडी संभाजीनगर येथील जी प शाळेत सरस्वती पूजना च्या कार्यक्रमाला गेले असता शिवसेना तालुका प्रमुख मंगेश गुरव यांना तिथल्या अंगणवाडी सेविकांनी भेट घेत अंगणवाडीतील काही अपूर्ण कामाची माहिती दिली त्यामध्ये एल इ डी टीव्ही,ऍक्वागार्ड,लाईट फिटिंग, व बैठक व्यवस्था संदर्भात कामे अर्धवट स्थितीत असल्याबद्दल माहिती दिली. तसेच येथील पालक व ग्रामस्थ श्री किरण गुरव यांनी यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली असता, त्याची तातडीने दखल घेऊन शिवसेना तालुका प्रमुख मंगेश गुरव, शहरप्रमुख श्री सुहास राऊत व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य श्री मंगेश ब्रह्मदांडे यांनी तातडीने लाईट फिटिंग करून देत कामाची पूर्तता केली.

तसेच येथील मुलाच्या बैठक व्यवस्थेसाठी 5 बेंच देण्याचेही श्री गुरव यांनी मान्य केले आहे. त्याची पुरता लवकरच करण्यात येईल असे जाहीर केले.

या बद्दल अंगणवाडी सेविका ब्रह्मदंडे व वनिता गुरव, ग्रामस्थ किरण गुरव, निखिल गुरव व पालकवर्गाने सर्वाचे आभार मानले.

error: Content is protected !!