मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत शेर्पे गावात स्वच्छता मोहीम संपन्न

मुख्यमंत्री समृद्ध गाव पंचायतराज अभियाना अंतर्गत कणकवली तालुक्यातील शेर्पे या गावात ग्रामपंचायतीच्या वतीने व ग्रामस्थांच्या सहकार्याने गावातील सार्वजनिक ठिकाणे व पायवाटा रस्ते यांची साफ सफाई व स्वच्छता गावच्या सरपंच सौ. स्मिता पांचाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच करण्यात आली.
यावेळी शेर्पे उपसरपंच श्री. सिराज मुजावर, ग्रा. पं. सदस्य श्री भूषण शेलार, सायली पांचाळ, म. गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री. चंद्रकांत कांबळे, अशा स्वयंसेविका श्रीम. सरिता शेलार, अंगणवाडी मदतनीस श्रीम. लता पांचाळ, ग्रामस्थ श्री. विलास पांचाळ, श्री. पप्या कुलकर्णी, गौतम कांबळे, मधुकर शेलार, एकनाथ शेलार, रवींद्र बेळणेकर आदी पदाधिकारी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
शेर्पे ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेत गावातील सर्व नागरिकांनी सहभाग घेतला व आपल्या स्वतःच्या परिसरा बरोबरच संपूर्ण गावचा परिसर स्वच्छ केला. व महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान गावात राबवून जनतेमध्ये जनजागृती निर्माण केली.

error: Content is protected !!