योगासन स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे ची चमक

कणकवली/मयूर ठाकूर ओरोस येथे नुकत्याच संपन्न झालेल्या शालेय योगासन स्पर्धेत योगाच्या विविध प्रकारांमध्ये ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वरवडे च्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले.
योगा हे उत्तम शरीरासाठी व तंदुरुस्तीसाठी आवश्यक आहे,याच उद्देशाने या योगासन स्पर्धा चे आयोजन केले जाते.
ट्रॅडिशनल योगासन इव्हेंटमध्ये 14 वर्षाखालील मुलींच्या गटात कु.निधी सावंत हिने प्रथम क्रमांक तर याच गटात या मुलांमधून कु.प्रचित जाधव याने तृतीय क्रमांक पटकावला आहे.
17 वर्षाखालील मुलांच्या गटात कु.हितेश डिचोलकर प्रथम मुलींमधून कु.तमन्ना पटेल तृतीय क्रमांक विजेती ठरली आहे.
19 वर्षाखालील मुलांच्या गटात कु.आयुष बागवे, कु.गिरीजा मोहिते प्रथम तर भावेश घाडीगावकर तिसरा आला आहे.

  • आर्टिस्टिक सिंगल इव्हेंट
  • 17 वर्षाखालील मुलींमध्ये कु.शिफा पटेल तृतीय क्रमांक प्राप्त, 17 वर्षाखालील मुलांमध्ये कु.हितेश डिचोलकर प्रथम क्रमांक,19 वर्षाखालील मुलींमध्ये गिरीजा मोहिते प्रथम क्रमांक,19 वर्षाखालील मुलांमध्ये आयुष बागवे यांस प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.
     रिदमिक योगा

17 वर्षाखालील मुलीमध्ये कु.शिफा पटेल आणि कु.तमन्ना पटेल या दोघीनी द्वितीय क्रमांक मिळविला आहे
कु.सिद्धी प्रसाद व कु.रिद्धी प्रसाद या दोघीनी तृतीय क्रमांक पटकवला विजेत्या स्पर्धाकांमधून कु. निधी सावंत, हितेश डिचोलकर, आयुष बागवे,गिरीजा मोहिते यांची विभाग स्तरावर निवड झाली आहे.
या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे,उपाध्यक्ष श्री मोहन सावंत,कार्याध्यक्ष श्री. बुलंद पटेल,सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे,सहसचिव प्राध्यापक निलेश महिंद्रकर,खजिनदार सौ. शितल सावंत मॅडम, सल्लागार डी.पी तानावडे सर, मुख्याध्यापिका सौ. अर्चना शेखर देसाई शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
तसेच विशेष अतिथी श्री. आत्माराम पाताडे हे सत्कार प्रसंगी उपस्थित होते.

या सर्व स्पर्धकांना योग शिक्षिका सौ. श्वेता गावडे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले

error: Content is protected !!