शिडवणे ग्रामपंचायत येथे आरोग्य शिबिर संपन्न

कणकवली तालुक्यातील खारेपाटण प्रा. आ. केंद्र अंतर्गत येणाऱ्या शिडवणे उपकेंद्र व शिडवणे ग्रामपंचायत कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गावात नुकतेच “स्वस्थ नारी सशक्त परिवार” व सेवा पंधरवड्या निमित्ताने आरोग्य शिबिराचे आयोजन गावचे सरपंच रवींद्र शेट्ये यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. शिडवणे ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचा शुभारंभ सरपंच रवींद्र शेट्ये यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला. या कार्यक्रमाला खारेपाटण प्रा. आ. केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम, आरोग्य समुदाय अधिकारी डॉ. प्रणव पाटील, आरोग्य सेविका लक्ष्मी करोड, आरोग्य सेवक गणेश तेली, लॅब असिस्टंट कुमार वाघमारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या शिबिराला उपस्थित असलेल्या खारेपाटण प्रा.आ. केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम यांचे शिडवणे सरपंच रवींद्र शेट्ये यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. उपस्थित नागरिकांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करत आरोग्य सेवेचा लाभ नागरिकांनी घेऊन आपले आरोग्य निरोगी राखण्याचे आवाहन यावेळी डॉ. वडाम यांनी ग्रामस्थान केले. तर सरपंच रवींद्र शेट्ये यांनी देखील यावेळी नागरिकांना मार्गदर्शन केले. या शिबिरात नागरिकांचे आयुष्यमान भारत कार्ड व PMJAY कार्ड ऑनलाइन काढून देण्यात आली. तसेच तसेच महिलांच्या हिंमोग्लोबिन, रक्तदाब आदी विविध तपासण्या मोफत करण्यात आल्या. तर या आरोग्य शिबिरात एकूण ३२ लाभार्थ्यांना आरोग्य लाभाची कार्ड काढून देण्यात आली. या शिबिरात डॉ. वडाम आणि सरपंच रवींद्र शेट्ये यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले. शिबिरात नागरिकांना आयुष्यमान भारत आणि PMJAY कार्ड ऑनलाइन काढून देण्यात आले. तसेच, महिलांच्या हिमोग्लोबिन, रक्तदाब आदी तपासण्या मोफत करण्यात आल्या. एकूण ३२ लाभार्थ्यांना आरोग्य लाभाची कार्ड देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार आरोग्य कर्मचारी गणेश तेली यांनी केले.

error: Content is protected !!