कामत ग्रुप ऑफ बिल्डर्सतर्फे खारेपाटण प्रशालेतील १५ विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून कामत ग्रुप ऑफ बिल्डर्स कणकवली यांच्या वतीने नुकतेच खारेपाटण हायस्कूल मधील एकूण १५ गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप शाळेचे मुख्याध्यापक श्री. संजय सानप यांचे शुभहस्ते शाळेत करण्यात आले.
कामात बिल्डर्स यांच्या या उपक्रमामुळे शालेय विद्यार्थ्यांना नवीन गणवेश मिळाल्याचा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकताना दिसत होता. तर “शिक्षण हीच खरी गुंतवणूक” या सामाजिक भावनेतून कामत बिल्डर्स यांच्याकडून सुमारे २२५००/- रुपये किमतीचे एकूण १५ गणवेश गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी प्रशालेच्या वतीने कामत बिल्डर चे प्रतिनिधी श्री. प्रणव प्रकाश कामत यांचे प्रशालेच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी कामत बिल्डर समूह नेहमी प्रयत्नशील असतो. या उपक्रमासाठी प्रशालेतील सहाय्यक शिक्षक श्री. ठाकूर सर यांनी विशेष प्रयत्न केले. कामत बिल्डर यांच्या या उपक्रमाचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष श्री. भाऊ राणे, सचिव – श्री. महेश कोळसुलकर सर्व विश्वस्त तसेच प्रशालेचे प्राचार्य श्री. संजय सानप पर्यवेक्षक श्री. संतोष राऊत व शिक्षक वृंद गणवेश वाटप कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते.

error: Content is protected !!