कुरंगवणे – बेर्ले ग्रूप ग्रामपंचायतीच्या वतीने खारेपाटण प्रा.आ केंद्र व उपकेंद्र शेर्पे यांना औषध वाटप

कणकवली तालुक्यातील कुरंगवणे – बेर्ले ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने नुकतेच प्राथमिक आरोग्य केंद्र खारेपाटण व उपकेंद्र शेर्पे यांना अत्यावश्यक असणारे औषधांचे वाटप माजी जि. प. बांधकाम व वित्त सभापती श्री. रवींद्र उर्फ बाळा जठार यांच्या प्रमुख उपस्थितीत खारेपाटण प्रा. आ. केंद्र येथे करण्यात आले.
या कार्यक्रमाला कुरंगवणे – बेर्ले ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. संतोष उर्फ पप्पू ब्रम्हदंडे, उपसरपंच श्री. बाबाला गोसावी, माजी पं. स. सदस्य सौ. तृप्ती माळवदे, चिंचवली सरपंच श्री. अशोक पाटील, शेर्पे सरपंच सौ. स्मिता पांचाळ, माजी सरपंच श्रीम. निशा गुरव, माजी उपसरपंच श्री. विलास पांचाळ, कुरंगवणे ग्रा. पं. सदस्य बबलू पवार, सौ. विशाखा राऊत, रवींद्र पवार, अक्षदा सादीकले, स्नेहा गोसावी, खारेपाटण प्रा. आ. केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम, आरोग्य सहाय्यक श्री. वानोळे, आशा स्वयंसेविका गतप्रवर्तक सौ. संकिता पाटणकर, आरोग्य सहाय्यिका श्रीम. बावकर, फार्मसिस्ट श्रीम. डोंगरे मॅडम, अशा सेविका सौ. वैष्णवी पवार, सौ. लता शेलार, ग्रामस्थ श्री. शाबान मुजावर, श्री. महेंद्र शेलार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कुरंगवणे – बेर्ले बेर्ले ग्रामपंचायतीच्या वतीने येथील दशक्रोशीतील नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने चांगली व अत्यावश्यक औषधे मिळावीत या उद्देशाने आमच्या ग्रामपंचायतीने पुढाकर घेऊन शेर्पे उपकेंद्र व खारेपाटण प्रा. आ. केंद्राला औषध पुरवठा केली असून याचा लाभ सामान्य जनतेला व्हावा हाच आमचा उद्देश असल्याचे यावेळी कुरंगवणे सरपंच श्री. पप्पू ब्रम्हदंडे यांनी सांगितले.





