मी फजित वाडेकर

हसून लोटपोट करणारी एक अनोखी नाट्यमय संध्याकाळ!


हृदयाची शस्त्रक्रिया कौशल्याने करणारे प्रख्यात कार्डिॲक सर्जन डॉ. अनिल तेंडोलकर आता रसिकांच्या हृदयाचा ठाव घेण्यासाठी रंगमंचावर येत आहेत, त्यांच्या बहुचर्चित आणि निखळ मनोरंजक एकपात्री प्रयोगासह — मी फजित वाडेकर !!
वैद्यकीय जगतातून थेट रंगभूमीवर घडणारा हा हास्याचा प्रवास आणि अभिनयाची जुगलबंदी अनुभवण्यासाठी सर्व रसिक प्रेक्षकांना सस्नेह निमंत्रण.

कार्यक्रमाची रूपरेषा:
प्रयोग: ‘मी फजित वाडेकर’ (एकपात्री प्रयोग)

कलाकार: डॉ. अनिल तेंडोलकर

वार व दिनांक: रविवार, ४ ऑक्टोबर २०२६
वेळ: रात्री ठिक ८.०० वाजता

स्थळ: मधुसूदन कालेलकर हाॅल, वेंगुर्ला.

आयोजक: डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब (DFC), वेंगुर्ला वर्किंग कमिटी.
प्रायोजक: SRC / SDRC

ह्याचे प्रयोग फक्त मुंबई, गोवा येथे झालेत.
सरांच्या वैद्यकीय क्षेत्रात विद्यार्थी दशेपासून विभाग प्रमुख पदापर्यंत पोचताना जे जे अनुभव आले. विशेषतः जिथे जिथे फजिती झाली, (रुग्णांकडुन, सहका-यांकडून) त्या स्वानुभवावर आधारित.

error: Content is protected !!