जिल्हा परिषद शाळा खारेपाटण रामेश्वर नगर मध्ये माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न

शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे-सरपंच प्राची इस्वलकर

दि .5 ऑक्टोबर 2025 रोजी खारेपाटण रामेश्वर नगर शाळेच्या सभागृहात माजी विद्यार्थी ग्रामस्थ व पालक यांचा ‘स्नेह मेळावा ‘शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीमती नर्गिस मुलांनी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
याप्रसंगी खारेपाटण सरपंच श्रीमती प्राची इस्वलकर ग्रामपंचायत सदस्य श्रीमती मनाली होनाळे आणि श्रीमती क्षितिजा धुमाळे उपस्थित होत्या. तसेच श्री मंगेश गुरव श्री. सुधीर कुबल, श्री. प्राजल कुबल, श्री. राजेंद्र वरूणकर, श्री. सलीम मुलाणी, अभय ठाकूर देसाई, श्री. सुरेश तावडे, श्री. विलास ठाकूर देसाई इत्यादी मान्यवर आणि सुमारे 60 माजी विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी श्री. मंगेश गुरव यांनी शाळेची एकंदरीत जडणघडण व पूर्ण झालेल्या भौतिक सुविधा आणि आवश्यक असणाऱ्या भौतिक सुविधा याचा आढावा घेतला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच श्री. सलीम मुलाणी, श्री. राजेंद्र वरूणकर, श्री. सुधीर कुबल, श्री. प्राजल कुबल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष धुळप यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आभार मानले. तसेच उपशिक्षिका श्रीमती सुवर्णा बुरंगे यांनी सर्वांचे स्वागत केले. सरपंच श्रीमती प्राची इस्वलकर यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विद्यार्थी व पालक ग्रामस्थ यांनी योगदान द्यावे. कारण आपला मदतीचा एक हात मुलांचे भवितव्य उजळू शकतो असे प्रतिपादन केले.
सध्या शाळेला आवश्यक असणाऱ्या भौतिक सुविधा म्हणजे कंपाउंड वॉल, प्रोजेक्टर, किचन शेड दुरुस्ती व इतर सुविधा पूर्ण करण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करू अशी ग्वाही माजी विद्यार्थ्यांनी दिली.
तसेच आज पासून ‘ माझी शाळा माझे योगदान ‘ हे अभियान सुरू करत असल्याचे माजी विद्यार्थी पालक व ग्रामस्थ यांनी जाहीर केले व या अभियानात प्रत्येकाने हातभार लावावा असे आवाहन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व पालक यांचे विशेष सहकार्य लाभले.

error: Content is protected !!