बहु कौशल्य प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांनी स्वाभिवलंबी होणे करिता फायदा घ्यावा

खासदार अरविंद सावंत यांचे प्रतिपादन

    सोबती सोशल फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने ‘सर्वांगीण विकास उपक्रमांतर्गत प्रायोजित’ साधने व उपकरणे  उद्धघाटन सोहळा शंकर महादेव गुरुकुल विद्यालय, कुंभवडे येथे उत्साहात संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष तथा माननीय खासदार श्री. अरविंदजी सावंत साहेब यांच्या हस्ते या विभागाचे उद्धघाटन करण्यात आले.

बहुकौशल्य सहाय्यक प्रशिक्षण (MSAT) उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण मिळावे, तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध साधने व उपकरणांचा प्रत्यक्ष वापर करून कौशल्याधारित प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
या कार्यक्रमास संस्थेचे सचिव श्री. शशिकांत सावंत, विश्वस्त तथा शालेय समितीचे कार्याध्यक्ष ॲड. राजेंद्र रावराणे, विश्वस्त योगिनी गुरव, सोबती सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. प्रमोद सावंत, यशवंत साटम,शालेय समितीचे उपाध्यक्ष लक्ष्मण सावंत, सावली पांचाळ, गुरुकुल समितीचे सचिव मधुकर सावंत, अजित सावंत, अजित भाट, चेतन तावडे,ग्रामस्थ तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अपूर्वा सावंत, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासाला चालना मिळून त्यांना भविष्यातील विविध संधींसाठी उपयुक्त प्रशिक्षण मिळणार आहे. कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.

error: Content is protected !!