आंगण का मिलन या उपक्रमांतर्गत भाजपा तालुकाध्यक्ष, पदाधिकारी अंगणवाड्यांमध्ये

अंगणवाडी सेविका यांचे केले कौतुक

शासकीय योजनांचा घेतला आढावा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह अभियान संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. भाजपा शहर मंडल मधील या अभियानाचा एक भाग आंगण का मिलन आहे. आणि त्या अंतर्गत जिल्ह्यातील बहुतांश अंगणवाडींना भेट देऊन अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा सन्मान करणे, अंगणवाडीतील मुलांसोबत वेळ घालवणे, स्तनदा आणि गरोदर मातांना भेटणे. मातृ वंदनाचा लाभ घेतलेल्या महिलांशी संवाद साधणे. अशाप्रकारे हे अभियानाचा उद्देश आहे.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस तळागाळातील लोकांपर्यंत पोहचतात. 0 ते 6 वर्षापर्यंतच्या मुलांचे संगोपन करणे, त्यांच्यावर संस्कार घडवणे, त्यांना योग्य पोषण आहार देणे. आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी त्या घेत असतात. तसेच स्तनदा माता असतील गरोदर माता असतील त्यांनाही योग्य पोषण आहार देण्याची जबाबदारी या सेविका पार पडत असतात. शासनाच्या ज्या योजना जसे की मातृ वंदना, लाडकी बहीण, त्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम देखील या सेविका मदतनीस करत असतात.
आणि म्हणूनच या सेविका मदतनीस यांचा सन्मान करण्यासाठी कणकवली तालुक्यातील अनेक अंगणवाडींना भेट देण्यात आली.
यामध्ये वागदे आर्यादुर्गा, वागदे डंगळवाडी, ओसरगाव कानसळी, ओसरगाव खासकीलवाडी, बोर्डवे शाळा नंबर एक, श्री हनुमान मंदिर जाणवली अंगणवाडी शाळा, हुमरट शाळा नंबर एक, , अंगणवाडी बेळणे शाळा क्रमांक एक, अंगणवाडी तिवरे खालचीवाडी‌ अशा वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन सेविका आणि मदतनीस यांचा सन्मान करण्यात आला. मुलांना खाऊ वाटप करून स्तनदा आणि गरोदर मातांशी संवाद साधला.
यावेळी मेघा अजय गांगण संयोजिका आंगण का मिलन, मिलिंद मेस्त्री भारतीय जनता पक्षाचे कणकवली शहर मंडल तालुकाध्यक्ष, शीतल दळवी कळसुली जि. प. सदस्य, कणकवली पंचायत समिती सभापती हर्षदा वाळके, पंचायत समिती सदस्य माहेश्वरी चव्हाण, वंदना पारकर, सरपंच सुप्रिया कदम, सरपंच वेदांगी पाताडे, राहुल आंगणे, साक्षी वाळके सुप्रिया चंद्रशेखर काणेकर,चंद्रशेखर काणेकर इत्यादी उपस्थित होते.

error: Content is protected !!