कणकवली ऑटो रिक्षा चालक-मालक सार्वजनिक गणेशोत्सवात आरतीचा मान

उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक संकेत नाईक व नगरसेवक जयेश धुमाळे यांच्या हस्ते कणकवलीच्या राजाची आरती

कणकवली ऑटो रिक्षा चालक-मालक सार्वजनिक कला-क्रीडा मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या गणेशोत्सवात कणकवलीचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक संकेत नाईक व नगरसेवक जयेश धुमाळे यांना आरतीचा मान देण्यात आला. त्यांच्या हस्ते ‘कणकवलीच्या राजा’ची भक्तिभावाने आरती करण्यात आली.
कणकवली ऑटो रिक्षा चालक-मालक सार्वजनिक कला-क्रीडा मंडळाची स्थापना सन १९८२ मध्ये करण्यात आली. त्यावेळी कै. श्रीधरराव नाईक हे रिक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष होते. कै. राजेंद्र रावराणे, अशोक करंबेळकर, सतीश नाडकर्णी, प्रभाकर कोरगावकर, प्रभाकर जोशी व किशोर साळगावकर यांनी कणकवलीतील सार्वजनिक गणेशोत्सवाचा पाया रोवला. याच माध्यमातून ऑटो रिक्षा चालक-मालकांचा २१ दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला.
सन १९८२ मध्ये कणकवलीत सुमारे ५० रिक्षा होत्या. आजच्या घडीला कणकवली शहर व परिसरात ७०० हून अधिक रिक्षा व्यवसाय सुरू आहेत. गेल्या ४३ वर्षांपासून ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेच्या माध्यमातून ‘कणकवलीच्या राजा’ची अविरत सेवा सुरू आहे.
भाविकांच्या हाकेला धावणारा व नवसाला पावणारा अशी ‘कणकवलीच्या राजा’ची भक्तांमध्ये श्रद्धा आहे. गणेशोत्सवाच्या २१ दिवसांच्या कालावधीत मंडळाच्या वतीने विविध धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये दशावतारी नाटक, डबलबारी यांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असतो.
यावेळी बाळा वराडकर, संतोष सावंत, उदय मौर्ये, मनोज वारे, संदीप घाडीगावकर, सखाराम राणे, उमेश जावडेकर आदी ऑटो रिक्षा चालक-मालक व पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!