बँकेत अधिकारी असल्याचे भासवून 4 लाख 80 हजाराची फसवणूक करणारा आरोपी मंगेश बागवे अखेर एलसीबीच्या जाळ्यात

सहाय्यक पोलीस निरीक्षक सनील पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाची धडक कारवाई
आतापर्यंत सनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने लागोपाठ अनेक गुन्ह्यांची केली उकल
बँकेत अधिकारी असून बँकेने जप्त केलेली गाडी कमी किमतीमध्ये मिळवून देतो, असे सांगून 4 लाख 80 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केले प्रकरणी पसार असलेला संशयित आरोपी मंगेश राघोजी बागवे, (वय 52 वर्षे, रा. सुदाम वाडी, अर्जुन निवास, दुसरा माळा, डोंबिवली (पूर्व), जि. ठाणे, मूळ रा. मसुरे, देऊळवाडी, ता. मालवण) याला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक सनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी तपास करत तांत्रिक विश्लेषणाव्दारे गोपनीय माहितीच्या आधारे 1 ऑक्टोबर रोजी डोंबिवली, ठाणे येथून ताब्यात घेत अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईबद्दल सनील पाटील यांच्या सह स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाचे कौतुक केले जात आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक, नयोमी साटम यांचे आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक, प्रविण कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक सनिल पाटील, सहा.पोउनि राजेंद्र जामसंडेकर,पोहेकॉ ज्ञानेश्वर तवटे, पोहेकॉ किरण देसाई, पोहेकॉ अविनाश ओटवणेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.






