रोटरी क्लब ऑफ खारेपाटण मार्फत फूड बास्केट चे वितरण

प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान या योजने अंतर्गत निक्षय मित्र म्हणून रोटरी क्लब ऑफ खारेपाटण मार्फत खारेपाटण विभागातील क्षय रुग्णांना मोफत फूड बास्केट चे वितरण नुकतेच खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रोटरी क्लब ऑफ खारेपाटण च्या वतीने करण्यात आले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ खारेपाटण चे उपाध्यक्ष रोटेरियन श्री. मंगेश ब्रम्हदंडे, क्लबचे फाउंडेशन चेअरमन रोटेरियन श्री. रमाकांत राऊत,रोटेरियन श्री. यशवंत रायबागकर,रोटेरियन श्री. सुबोध देसाई, रोटेरियन श्री. मंगेश गुरव तसेच भाजप कार्यकर्ते श्री. सूर्यकांत भालेकर, आरोग्य सहाय्यक श्री. के एस वानोळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी क्लबचे उपाध्यक्ष रोटेरियन मंगेश ब्रम्हदंडे यांनी रोटरी क्लब खारेपाटण मार्फत अशाच प्रकारची समाज उपयोगी कामे करण्याचा मानस व्यक्त केला.

error: Content is protected !!