कुरंगवणे येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम

महाराष्ट्र शासनाच्या वतीने संपूर्ण राज्यात सन २०२५ – २६ या आर्थिक वर्षापासून सुरू केलेल्या मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानाचा शुभारंभ कणकवली तालुक्यातील कुरंगवणे – बेर्ले ग्रुप ग्रामपंचायत मध्ये सरपंच श्री. संतोष उर्फ पप्पू ब्रम्हदंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत गावात स्वच्छता मोहीम उपक्रम राबवून करण्यात आली.
यावेळी उपसरपंच श्री. बाबाला गोसावी, ग्रा. पं. सदस्य श्री. बबलू पवार, श्री. रवींद्र पवार, श्रीम. विशाखा राऊत, अक्षदा सादीकले, स्नेहा गोसावी, सारिका कुडाळकर, ग्रामपंचायत अधिकारी श्री. गिरीश धुमाळे, खारेपाटण प्रा. आ. केंद्र आरोग्य सहाय्यक श्री. प्रवीण भागवत, सामाजिक कार्यकर्ते श्री. रवींद्र लाड, महावीर गोसावी, नारायण कदम, पांडुरंग गोठणकर, मधुसूदन पवार, महिला बचत गटाच्या सी आर पी श्रीम. सोनाली पवार, दीप्ती पाटील, आशा स्वयंसेविका श्रीम वैष्णवी पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या स्वच्छते मोहिमे अंतर्गत गावातील सार्वजनिक ठिकाणे व पायवाटा स्वच करण्यात येणार असल्याने या उपक्रमास गावातील ग्रामस्थानी सहकार्य करावे असे आवाहन सरपंच श्री. पप्पू ब्रम्हदंडे यांनी यावेळी सांगितले. तर गावातील काही प्रमुख ठिकाणे स्वच्छ करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत गावकऱ्यांनी मोठ्या उस्फूर्तपणे सहभाग घेतला.





