भाजप पक्षाच्या कणकवली तालुका सोशल मिडिया संयोजक पदी मयुरेश लिंगायत यांची फेर निवड

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे व भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा सोशल मिडिया संयोजक श्रीकृष्ण परब यांच्या आदेशान्वये कणकवली देवगड व वैभववाडी विधानसभा मतदार संघाच्या सोशल मिडिया संयोजक प्रमुख पदी पुन्हा एकदा श्रीकृष्ण मयुरेश लिंगायत यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
कणकवली तालुक्यातील साळीस्ते या गावचे सुपुत्र असलेले श्री मयुरेश लिंगायत यांची कणकवली ग्रामीण मंडल सोशल मीडिया संयोजक पदी निवड फेर निवड झाली असून मागील तीन वर्षात सोशल मीडिया संयोजक म्हणून त्यांनी उलेखनिय काम केले असल्यामुळे पुन्हा एकदा त्यांची संयोजक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व भाजप पक्षाचे विद्यमान खासदार व माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मयुरेश लिंगायत यांनी भेट घेऊन त्याचे शुभ आशीर्वाद घेतले आहेत.
श्री लिंगायत यांचेकडे काम करण्याचा अनुभव व उत्तम भाषा शैलीच्या प्रभावावर कणकवली ग्रामीण मंडलची नियोजनबध्द व यशस्वी जबाबदारी ते पार पाडतील असा विश्वास सोशल मीडिया जिल्हा
संयोजक प्रमुख श्रीकृष्ण परब आणि कणकवली ग्रामीण मंडल तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर यांनी व्यक्त केला.





