आज होणार दक्षिणवाडा-पिरावाडी येथील प्राचीन हनुमान मंदिरात हनुमान चालीसा सामूहिक वाचन सोहळा

श्री. तरुण संघ आणि हनुमान मंदिर न्यास, दक्षिणवाडा – पिरावाडी यांच्या संयुक्त वतीने पुरातन हनुमान मंदिर येथे आज29 ऑगस्ट रोजी सायंकाळी 06-30 ते 07-30 यावेळात हनुमान चालीसा वाचन कार्यक्रम होणार आहे . यावेळी भक्तिदीप प्रज्वलन, श्री रामरक्षा पठण, हनुमान चालीसा सामूहिक वाचन, हनुमान स्तोत्र व मंत्र पठण, श्रींची महाआरती आणि श्रींची पालखी परिक्रमा असे कार्यक्रम होणार आहेत.तरी सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. तरुण संघ आणि हनुमान मंदिर न्यास, दक्षिणवाडा – पिरावाडी यांनी केले आहे.

error: Content is protected !!