महसूल सेवक पदास शासकीय चतुर्थ श्रेणी दर्जा देण्याबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महसूल सेवक (कोतवाल) बेमुदत संपावर

मालवण तालुक्यातील ३५कोतवाल आंदोलनात सहभागी- अध्यक्ष समिर गुरव यांची माहिती
राज्यातील महसूल सेवक(कोतवाल) यांना चतुर्थश्रेणीचा दर्जा मिळावा ही मागणी करत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महसूल सेवक यांनी विदर्भ महसूल सेवक संघटना नागपूर यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत आंदोलनात सहभागी झाले आहेत. मालवण येथील महसूल सेवक संघटनेतर्फे अध्यक्ष समिर गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण नायब तहसीलदार यांना निवेदन सादर केले यावेळी उपाध्यक्ष राहुल चव्हाण सचिव संतोष नाईक, सहसचिव सचिन चव्हाण सल्लागार संतोष तांबे कार्यकारणी सदस्य सुधीर लब्दे, गीता चौकेकर, स्वप्निल साळकर, श्रीधर नाईक, हेमंत कुंभार ,वर्षा रामाणे , यासह अन्य महसूल सेवक उपस्थित होते .याबाबत माहिती देताना महसूल सेवक तालुकाध्यक्ष समिर गुरव यांनी सांगितले की महसूल सेवक हा 24तास शासनाचा सेवक आहे.फक्त पंधरा हजार या तुटपुंज्या मानधनावर तो सेवा बजावत आहे. त्यात इलेक्शन ड्युटी,रात्र पाळी, बिएलओ, पीएम किसान, शासकीय दवंडी यासह अन्य कामे करावी लागत असल्याचे सांगितले. अल्प मानधनात आम्हाला हि कामे करावी लागतात. त्यामुळे आम्हाला शासनाने चतुर्थश्रेणीचा दर्जा द्यावा या साठी आमचा लढा असल्याचे सांगितले.





