पोलिसांवर चाकू हल्ला करणाऱ्या वैभववाडी येथील आरोपीला सश्रम करावास

सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. गजानन तोडकरी यांचा युक्तिवाद

वैभववाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असलेला आरोपी राजरत्न अंकुश देवकर (राहणार वैभववाडी) याला आज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधीर देशपांडे सो यांनी भादवी कलम 307,353, 332 कलमाखाली दोषी ठरवले. व आरोपीस 10 वर्ष सश्रम करावास अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सिंधुदुर्ग गजानन तोडकरी यांनी काम पाहिले.
आरोपीने 9/4/2022 रोजी बंदोबस्तकामी मदतीस गेलेल्या पोलिसांच्या अंगावर चाकूने हल्ला करून पोलीस नाईक रमेश नारनवर यांचे पाठीवर चाकूने चार वार केले होते. सदर गुन्ह्यात सरकारतर्फे 8 साक्षीदार तपासले होते. सुनावणी दरम्यान आरोपीने वेडसर असल्याचा बचाव घेतला होता. सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी आरोपीचा बचाव खोडून काढत वरिष्ठ न्यायालयाचे न्यायनिवाडे देऊन युक्तिवाद केला. आज सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी धरून शिक्षा सुनावली व आरोपीची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली. गुन्ह्याचे तपास काम पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई यांनी केले होते.

error: Content is protected !!