देवगडमध्ये जुगार अड्ड्यावर छापा – आरोपी भाजपशी,पालकमंत्री याच्याशी संबंधित, म्हणून कारवाईला विलंब?

युवासेना देवगड तालुकाप्रमुख गणेश गावकर यांचा आरोप
21 सप्टेंबर 2025 रोजी देवगड तालुक्यातील वाडा ब्राह्मणवाडी येथे पर्पल मॅंगो होम स्टे या ठिकाणी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून 8 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या छाप्यात सुमारे ₹1.17 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणात सर्व आरोपी हे भाजप सत्ताधारी पक्षाशी संबंधित असून, काही आरोपी भाजप च्या तालुका कार्यकारणीत देखील आहेत.
स्थानिक प्रशासन या कारवाईत केवळ दिखाऊ कृती करत असल्याची जोरदार चर्चा आहे. आरोपींमध्ये काहींचे थेट संबंध भाजपशी आहेत, असे स्थानिक जनतेतून आवाज उठवला जात आहे.
कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे BJP राज है ये..
पालकमंत्री नितेश राणे काळेधंदे अजिबात चालू देणार नाहीत असे वारंवार म्हणतात पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी केले तर चालतील अस त्यांचं म्हणणं आहे का? असा सवाल यावेळी युवासेना देवगड तालुका प्रमुख गणेश गावकर यांनी केला.
पोलीस प्रशासनावर कारवाई करू नये म्हणून पालकमंत्री याचा दबाव आहे. कारवाईत जप्त केलेले फ़ोन सुद्धा देण्यासाठी विशेष दबाव आहे.राजकीय दबावाखाली कारवाई थांबवली जात असेल, तर हा प्रकार गुन्हेगारांना संरक्षण देण्यासारखा असून कायदा व्यवस्थेला हरताळ फासणारा आहे. यासंदर्भात खालील मागण्या करण्यात येत आहेत:
1. तत्काळ कठोर कारवाई करावी – गुन्हा सिद्ध होतोय तोवर संबंधित आरोपींवर अटकेसारखी कठोर कारवाई व्हावी.
2. राजकीय हस्तक्षेप होऊ नये – पोलिसांवर राजकीय दबाव टाकला जात असल्यास त्याची चौकशी व्हावी.
3. प्रशासनाची भूमिका स्पष्ट करावी – जिल्हा पोलीस अधीक्षक व पालकमंत्री यांनी यावर खुलासा करावा.
4. निष्पक्ष तपास व्हावा – तपास यंत्रणा बाहेरून नियुक्त करून प्रकरणाची पारदर्शक चौकशी करण्यात यावी.
फक्त काय सामान्य माणसांवरच कायदा लागू आहे? हे प्रकरण स्पष्ट दाखवते की “सामान्य नागरिकांवर कायदा तात्काळ लागू होतो, पण सत्ताधाऱ्यांशी संबंधित असलेल्यांना सवलती दिल्या जातात”, असा समज लोकांमध्ये वाढत आहे. हे लोकशाहीस अपमानित करणारे आहे. या प्रकरणात कोणताही राजकीय हस्तक्षेप न होता संपूर्ण पारदर्शक व निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे.




