कणकवलीत भाजपच्या नवरात्रोत्सवात धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

तालुक्यातील भाजपाचे आठही विभागातील कार्यकर्ते करणार सेवा
दशावतारी नाटक, डबलबारी भजनांचा सामना , धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
कणकवली तालुका भाजपच्यावतीने खासदार नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालय येथे दुर्गामातेची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यानिमित्त २ आॅक्टोरपर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार २४ रोजी हरकुळ विभागातर्फे सकाळी ८ वा. कुंकुमार्जन पूजा , दुपारी ३ नंतर सुस्वर संगीत भजने , रात्री ८ वा. पार्सेकर दशावतार नाट्यमंडळ वेंगुर्ला यांचा प्रयोग, गुरुवार २५ रोजी जानवली विभागातर्फे सकाळी ८ वा. कुंकुमार्जन पूजा, दुपारी ३ नंतर सुस्वर संगीत भजने, रात्री ८ वा. लोकराजा कै. सुधीर कलिंगण, प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेहरू , यांचा प्रयोग , शुक्रवार २६ रोजी खारेपाटण विभागातर्फे सकाळी ८ वा. कुंकुमार्जन पूजा , दुपारी ३ नंतर सुस्वर संगीत भजने , रात्री ८ वा. दांडिया व फुगडी नृत्य, शनिवार २७ रोजी फोंडा विभागातर्फे सकाळी ८ वा. कुंकुमार्जन पूजा , दुपारी ३ नंतर सुस्वर संगीत भजने , रात्री ८ वा. भाई कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरुर यांचा प्रयोग, रविवार २८ रोजी कळसुली विभागातर्फे सकाळी ८ वा. कुंकूमार्जन पूजा,दुपारी ३ नंतर सुस्वर संगीत भजने, रात्री ८ वा. नाथा नालंग प्रस्तुत वालावलकर दशावतार नाट्यमंडळ ओसरगाव यांचा दशावतारी प्रयोग, सोमवार २९ रोजी कासार्डे विभागातर्फे सकाळी ८. वा. कुंकुमार्जन पूजा, दुपारी ३ नंतर सुस्वर संगीत भजने , रात्री ८ वा. वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ तेंडोली यांचा प्रयोग, मंगळवार ३० रोजी कलमठ विभागातर्फे सकाळी ८ वा. कुंकुमार्जन पूजा सकाळी १० वा. सत्यनारायणाची महापूजा , दुपारी १२ वा.तीर्थप्रसाद व महाप्रसाद, दुपारी ३ नंतर सुस्वर संगीत भजने , रात्री ८ वा. डबलबारी जंगी सामना बुवा सुशील गोठणकर आणि बुवा भालचंद्र केळुसकर यांच्यात होईल. बुधवार १ रोजी सकाळी ८ वा. दुपारी ३ नंतर सुस्वर संगीत भजने, रात्री ८ वा. शरद मोचेमाडकर, प्रस्तुत जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ आरोस यांचा दशावतारी प्रयोग, गुरुवार २ रोजी सकाळी ८ वा. कुंकुमार्जन पूजा, रात्री ८ वा. डबलबारी जंगी सामना बुवा गुंडू सावंत आणि दीपक नानचे ,शुक्रवार ३ रोजी सायं. ४ वा. देवीची विसर्जन मिरवणूक. तरी सर्वांनी या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपच्यावतीने करण्यात आले आहे.





