साकेडी गावातील रेल्वे अंडरपासला मंजुरी – २ कोटींचा निधी मंजूर

माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांनी केला होता पाठपुरावा

सरपंच श्री सुरेश साटम व उपसरपंच प्रज्वल वर्दम यांची माहिती

कणकवली तालुक्यातील साकेडी गावातील रेल्वे फाटक क्रमांक २४ येथे मोठ्या प्रमाणावर रहदारीची समस्या निर्माण झाली होती. गाव दोन भागांत विभागले गेले असून ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, रेशन दुकान, आरोग्यकेंद्र या महत्त्वाच्या सुविधा रेल्वे फाटकाच्या पलीकडे असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता.या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांच्या मागणीनुसार रेल्वे अंडरपासच्या कामाला मंजुरी देण्यात आली असून या कामासाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असुन लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरवात होनार असुन या अंडरपासच्या माध्यमातून शाळकरी मुले, रुग्णवाहिका तसेच ग्रामस्थांना ये-जा करणे सुलभ होणार आहे. त्यामुळे गावातील नागरिकांच्या दीर्घकाळच्या मागणीची पूर्तता होत असून सुरक्षित मार्ग उपलब्ध होणार आहे.
या कामासाठी माजी मुख्यमंत्री व खासदार श्री. नारायण राणे तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री श्री. नितेश राणे यांनी विशेष पाठपुरावा करून मदत केली आहे. असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.

error: Content is protected !!