भरणी गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी चंद्रकांत घाडीगांवकर यांची निवड

भरणी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित विशेष ग्रामसभेत तंटामुक्ती गाव समितीच्या अध्यक्षपदी चंद्रकांत घाडीगांवकर यांची एकमताने निवड करण्यात आली. सरपंच अनिल बागवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या वेळी तंटामुक्ती समितीचे सदस्य म्हणून सरपंच अनिल बागवे, उपसरपंच प्रशांत घाडीगावकर, पोलीस पाटील लक्ष्मीकांत ताम्हणकर, प्रतिष्ठित नागरिक गंगाराम गुरव, शाळा व्यवस्थापन समितीचे प्रतिनिधी प्रकाश बागवे, बीट हवालदार सुधीर घारकर, ग्रामसेवक वर्षा जाधव, मुख्याध्यापक के. टी. कळसुलकर, मंगेश जगताप, प्राची साळस्कर, मंगेश पालकर, श्यामसुंदर जगताप, शीतल गुरव, वनिता राऊळ, सुरेश गुरव, अश्विनी गुरव, दीपाली साळस्कर, सुनंदा जगताप आणि प्राकाश जगताप यांचा समावेश आहे.
ग्रामसभेत गावातील शांतता, सलोखा व सामाजिक समरसतेच्या दृष्टीने तंटामुक्ती समितीची भूमिका मोलाची असून, नव्याने गठित समिती गावातील वादविवाद सुटवण्यास व ग्रामविकासात योगदान देईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!