गतिमंद, दिव्यांग मुलांसाठी 25 सप्टेंबर रोजी करंजे येथे मोफत आरोग्य शिबिर

होमिओपॅथिक रिसर्च व डेव्हलपमेंट फाउंडेशन च्या वतीने आयोजन
होमिओपॅथिक रिसर्च व डेव्हलपमेंट फाउंडेशन च्या वतीने गतिमंद, दिव्यांग मुलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करंजे गतिमंद विद्यालय या ठिकाणी करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये डॉ. कविता सावंत, डॉ. दिपाली गुप्ते, डॉ. अबिदा परब, डॉ. मयूर गोसावी, डॉ. भैरवी गोसावी हे तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. तांबे एज्युकेशन सोसायटी मुंबई संचालित राजर्षी छत्रपती शाहू महाराज गतिमंद निवासी विद्यालय करंजे या ठिकाणी 25 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत हे शिबिर होणार आहे. अधिक माहितीसाठी मुख्याध्यापक रश्मी सोगम 9403369910 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





