ज्ञानदीप संस्था वायंगणी च्या अध्यक्ष पदी हनुमंत प्रभू

शालेय समिती अध्यक्ष पदी चंद्रकांत उर्फ बाबू हडक
ज्ञानदीप संस्था वायंगणीचे विद्यमान अध्यक्ष सदा राणे यांच्या दुःखद निधनाने रिक्त झालेल्या जागेवर वायंगणी गावचे माजी उपसरपंच हनुमंत प्रभू यांची निवड करण्यात आली. तर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी चंद्रकांत उर्फ बाबू हडकर यांची निवड करण्यात आली.
ज्ञानदीप वायंगणी संस्थेची सभा वायंगणी हायस्कूल येथे शनिवारी संपन्न झाली. यावेळी अध्यक्ष पदी हनुमंत प्रभू, सचिवपदी वैभव जोशी, खजिनदार पदी ऍड समृद्धी आसोलकर, सदस्य दिपक सुर्वे, मनोहर वायंगणकर, सुरेश सावंत, संतोष वायंगणकर, दिपक सावंत, विलास सावंत, उदय दुखंडे, अशोक सावंत, सुशांत आसोलकर, शंकर उर्फ बाळू वस्त, सुंदर सावंत, शालेय समिती अध्यक्ष चंद्रकांत हडकर यांची निवड करण्यात आली.




