सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची रामेश्वर वाचन मंदिरास भेट

उपक्रमशील वाचनालय गौरवोद्गार
दुर्मिळ ग्रंथसंपदा आणि सांस्कृतीक जोपासना करणारे असे हे आचरे गावचे रामेश्वर वाचनमंदिर असल्याचे गौरवोद्गार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी रामेश्वर वाचन मंदिर भेटी वेळी व्यक्त केले.
आचरा येथे आलेल्या जिल्हाधिकारी यांनी रामेश्वर मंदिरास भेट दिली. यावेळी त्यांनी शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या रामेश्वर वाचन मंदिरास भेट देत वाचनालयाच्या वाचन संस्कृती वाढीसाठी सुरु असलेल्या उपक्रमांबद्दल ग्रंथसंपदेबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी वाचनालयाचे कार्यवाह अर्जुन बापर्डेकर यांनी त्यांना ज्ञानेश्वरी भेट देत त्यांचा सन्मान केला. यावेळी त्यांच्या सोबत अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी साठे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, मालवण तहसीलदार वर्षा झालटे गटविकास अधिकारी शाम चव्हाण, सरपंच जेरोन फर्नांडीस, उपसरपंच संतोष मिराशी, देवस्थान समिती सदस्य संजय मिराशी, वाचन मंदिरचे सहाय्यक ग्रंथपाल महेश बापर्डेकर, समृद्धी मेस्त्री, स्वप्नील चव्हाण यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.





