सेवा पंधरावड्या अंतर्गत ऐनारी तलावाच्या भूसंपादन मोबदला वाटपासाठी शिबिराचे आयोजन

उपस्थित राहण्याचे करण्यात आले आहे आवाहन
सेवा पंधरवडा अंतर्गत “ शासन आपल्या दारी “ या मोहिमेतून जलसंधारण विभागाच्या लघू पाटबंधारे तलाव ऐनारी, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग साठी भूसंपादन प्रस्ताव क्र. २२/२००७ मधील शिल्लक निवाडा रक्कम दि. २९/०९/२०२५ रोजी १२ वाजलेपासून ग्रामपंचायत कार्यालय ऐनारी ता. वैभववाडी येथे वाटप करणेसाठी उपजिल्हाधिकारी भूसंपादन जिल्हा मुख्यालय ल. पा. सिंधुदुर्ग या कार्यालयाकडून कॅम्प आयोजित केलेला आहे. तरी सदरील कॅम्प मध्ये ज्या खातेदारांना अद्याप पर्यंत मोबदला वाटप केलेला नाही त्यांनी उपस्थित राहून मोबदला स्वीकारनेत यावा. मोबदला स्वीकारणेसाठी खातेदारांनी शिबिरात काही आवश्यक कागदपत्रे आणणे अनिवार्य आहे.
आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत:
१८९४ च्या अधिनियम कलम १२(२) खालील नोटीसची मूळ प्रत, पोलिस पाटील पंचनामा, मृत्यूचा दाखला आणि वारस नोंदणी उतारा (मयत लाभार्थ्यांसाठी), विवाद असल्यास, त्यासंबंधी नुकसान भरपाईचा बाँड पेपर (रु १००) आणि प्रतिज्ञापत्र, पूर्वी नुकसान भरपाई घेतली नसल्याचे शपथपत्र (रु १०० च्या बाँड पेपरवर), विहित नमुन्यातील स्व-घोषणापत्र (साध्या कागदावर), ओळखपत्र (आधार, पॅन), बँक पासबुक, रद्द केलेला कोरा चेक आणि अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो, OTP साठी सक्रिय मोबाइल नंबर आवश्यक आहे, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची फोटोकॉपी, वर्ग ०२ बागायत जमिनीचा मालकी हक्क पुरावा, नावातील बदलाचा पुरावा, जर लागू असेल तर. जर कागदपत्र घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
	




