भजनी कलाकार संस्थेचे अध्यक्ष बुवा संतोष कानडे यांच्या मातोश्री सुनिता हरिश्चंद्र कानडे यांचे निधन.

शनिवारी सकाळी 8.30 वाजता निघणार अंत्ययात्रा

कणकवली/मयूर ठाकूर

भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग या संस्थेचे संस्थाध्यक्ष आणि भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष बुवा संतोष कानडे यांच्या मातोश्री श्रीमती सुनीता हरिश्चंद्र कानडे (वय 78, रा. करमळकरवाडी,पियाळी) यांचे वृद्धपकाळाने नुकतेच दुपारी 12.30 वाजता निधन झाले.श्रीमती सुनीता यांची तब्येत खालावल्याने त्यांना संजीवनी हॉस्पिटल कणकवली येथे आणण्यात आले.परंतु उपचारा आधीच त्यांची प्राणज्योत मावळल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच भाजपा पदाधिकारी आणि भजनी कलाकारांनी रुग्णालयात गर्दी केली होती.त्यांची अंत्ययात्रा बुवा संतोष कानडे यांच्या पियाळी करमळकरवाडी येथील राहत्या निवासस्थानाकडून सकाळी 8.30 वाजता निघणार असून त्यांच्या पार्थिवावर शनिवार 20 सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता पियाळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.सुनीता यांच्या निधनाने तालुक्यात शोककळा पसरली असून . त्यांच्या पश्चत तीन मुलगे,विवाहित मुली,सुना,जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे.

error: Content is protected !!