मुक्त विद्यापीठ एक्स्टर्नल बी. एस्सी. पदवी प्रवेशासाठी मुदतवाढ

कुडाळ येथील बॅ नाथ पै कॉलेजमध्ये केंद्र सुरु
कुडाळ : येथील बॅरिस्टर नाथ पै कला, वाणिज्य आणि विज्ञान महिला महाविद्यालय येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे बहिस्थ विज्ञान (बी. एस्सी) पदवी केंद्र सुरू झाले असून बहिस्थ (एक्स्टर्नल) बी. एस्सी करणाऱ्यांसाठी एक सुसंधी या निमित्ताने प्राप्त झाली आहे. विद्यापीठातर्फे ३० सप्टेंबर पर्यंत प्रवेशाची मुदत वाढवून देण्यात आलेली आहे
बारावी सायन्स झालेल्या व नोकरी व्यवसायात अडकलेल्या विद्यार्थ्यांना बी. एस्सी पदवी कॉलेज नियमित असल्यामुळे इच्छा असूनही बी.एस्सी होता येत नव्हते ही गैरसोय दूर होऊन बारावी सायन्स झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरी व्यवसायसांभाळून बहिस्थ स्वरूपात बी. एस्सी पदवी घेता येणार आहे.
तरी इच्छुकानी अधिक माहितीसाठी केंद्रप्रमुख अरुण मर्गज (9423302859) किंवा केंद्र संयोजक नितीन बांबर्डेकर (9325104684) यांच्याशी संपर्क साधावा व या सुसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर व केंद्रप्रमुख प्राचार्य अरुण मर्गज, केंद्र समन्वयक प्रा. नितीन बांबर्डेकर यांनी केले आहे.





