विभागस्तरीय कलाउत्सव स्पर्धेमध्ये खारेपाटण हायस्कूलचे घवघवीत यश

राज्यस्तरावर निवड झालेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव शाळा
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या विभागस्तरीय कलाउत्सव – २०२५ या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय, खारेपाटण या विद्यालयातील विद्यार्थ्यांचा “समुह वाद्य वादन ” या कला प्रकारात विभागामध्ये प्रथम क्रमांक आला असून खारेपाटण हायस्कूलच्या या नेत्रदीपक यशाबद्दल शाळेचे व सहभागी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
महाराष्ट्र राज्य शैशणिक संशोधन व प्रशिक्षण पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या या कलाउत्सव स्पर्धेमध्ये सातारा, सांगली,कोल्हापूर,रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक आलेल्या शाळांच्या शालेय विद्यार्थी स्पर्धकांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली होती. नुकतेच या सर्व विद्यार्थ्यांचे खारेपाटण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रवीण लोकरे यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक संजय सानप, पर्यवेशक श्री. संतोष राऊत, शाळेचे शिक्षक श्री. संजय कापसे, लक्ष्मीकांत हरयाण, संगीत शिक्षक श्री. संदीप पेंडूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
"विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या संघाची समूह वाद्य वादन कला प्रकारात सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून राज्यस्तरावर निवड झालेली एकमेव शाळा आहे."
समूह वाद्यवादन या कला प्रकारामध्ये खारेपाटण हायस्कूलच्या कु.आर्या अनिल मोसमकर,आयुष प्रशांत मांगले, वंश मारुती कानडे, सुमित रविंद्र ठोसर या विद्यार्थ्यांनी लोकसंगीत वाद्यमेळ वादन सादर करून परीक्षकांची वाहवा मिळविली. तर या कला प्रकारासाठी श्रीधर पाचंगे व प्रशालेचे माजी विद्यार्थी श्री. मयूर जाधव यांचे विशेष सहकार्य मिळाले...
प्रथम क्रमांक विजेत्या या सर्व विद्यार्थ्यांची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेमध्येही प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद कामगिरी करताना तीन कलाप्रकारांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला होता.या सर्व स्पर्धकांना प्रशालेचे संगीत शिक्षक संगीत अलंकार, इंजिनिअर श्री. संदीप पेंडूरकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रवीण लोकरे, सर्व संचालक मंडळ, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कांबळे, मुख्याध्यापक श्री.संजय सानप, पर्यवेक्षक श्री. संतोष राऊत, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातर्फे सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन करण्यात आले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.





