श्री त्रिमूर्ती संगीत विद्यालय माणगाव कुडाळ केंद्राचा १०० टक्के निकाल

सुगम संगीत परीक्षा शंभर टक्के यशाची परंपरा राखली

श्री त्रिमुर्ती संगीत विद्यालय माणगांव विद्यालयामार्फत  जुलै महिन्यात झालेल्या सुगम संगीत परीक्षांचा कुडाळ केंद्राचा निकाल परंपरेप्रमाणे यावर्षीही १०० टक्के लागला. सुगम संगीत परीक्षेतील यशस्वी विद्यार्थाना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
     यावेळी कुडाळ गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, माजी कुडाळ व नेरूर केंद्रप्रमुख उदय शिरोडकर,  माजी पिंगुळी केंद्रप्रमुख वासुदेव मराठे, कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. तसेच विविध कला विषयात विशेष प्राविण्य व प्रथम क्रमांक मिळवलेल्या  विद्यार्थांचा पुष्पगुच्छ देऊन नृत्यांगना मृणाल सावंत यांच्याहस्ते सत्कार झाला.
यावेळी केंद्र संचालक राजाराम गव्हाणकर चंद्रशेखर आचरेकर, मिनिनाथ आडसरे, भारती बाक्रे, शार्दुल तुरंबेकर, इ. मान्यवर उपस्थित होते. यावेळी गायन जयेश तेंडुलकर प्रथमा, चंदशेखर आचरेकर-द्वितीया, जान्हवी हर्डीकर-मध्यमा,  निळकंठ गोखले, विशारद हार्मोनियम वादन – चंद्रशेखर आचरेकर-प्रथमा, शिवानी सर्वेकर-द्वितीया, अनुष्का काणेकर-तृतिया, सिद्धी डेगवेकर-मध्यमा, हेमंत तेली अलंकार भाग-२ गायन या विद्यार्थ्यांनी  विशेष प्राविण्यासह प्रथम क्रमांक पटकावला. सदर परिक्षाचे परीक्षक म्हणून वासुदेव सडवेलकर यानी काम पाहिले. त्यानी परीक्षेबरोबरच अलंकार  रागाचे सुगम संगीतातील रियाजाचे महत्व कथन केले. याबरोबर गायन, हार्मोनियम वादन, तबला वादनाचा रियाज कसा करावा. तसेच विविध स्पर्धांमध्ये सहभाग व सादरीकरण याबाबत मार्गदर्शन केले.
विद्यालयातर्फे शिक्षक म्हणून गायन व हार्मोनियम वाद‌नासाठी  राजाराम गव्हाणकर तबला वादनासाठी प्रमोद मुंडये यानी विद्यार्थांना मार्गदर्शन केले विद्यालयाने वरील विषयांचा सुगम संगीताचा अभ्यासक्रम स्वतंत्र केला आहे. सदर अभ्यासक्रमास कला व सांस्कृतिक कार्य  संचलनालय पुणे यांची मान्यता आहे. तसेच १० वीच्या २ ते ३ टक्के वाढीव गुणदानासाठी एसएससी बोडीची मान्यता असलेले सिंधुदुर्ग जिल्हयातील एकमेव विद्यालय आहे. वरील विषयांच्या मौखिक परीक्षेच्या अभ्यासक्रमाचे सुगम संगीत कलांगण पुस्तक  लेखक राजाराम गव्हाणकर यानी प्रकाशन केले असून सदर पुस्तकाचा लाभ विद्यार्थांनी घ्यावा.  तसेच शिक्षक व पालक यानीही घेऊन आपली कला विकसीत करावी असे आवाहन विद्यालयामार्फत करण्यात आले आहे.
या विद्यालयाची कुडाळ, देवगड, रत्नागिरी, दापोली हुपरी, गारगोटी, बेलापूर (नवी मुंबई) येथे परीक्षा केंद्रे सुरु असून त्या ठिकाणी अनुक्रमे प्राजक्ता गव्हाणकर शिल्पा दामले, मंजिरी घोलकर, निळकंठ गोखले ऐश्वर्या पोतदार, अस्मिता गव्हाणकर, गोपाळराव पाटील (उंडगे) हे केंद्रसंचालक म्हणून काम पहात आहेत.
तरी वरील विषयांच्या अभ्यासक्रमाचा लाभ ह्या परीसरातील कलाप्रेमीनी घ्यावा व आपली कला विकसित करावी असे आवाहन विद्यालयाचे उपाध्यक्ष भास्कर गुंजाळ व सचिव विजय भिसे यानी केले आहे.

error: Content is protected !!