भक्तिभावाने २१ दिवसांनी सिंधुदुर्ग राजाला निरोप

सिंधुदुर्गचा राजाच्या जयघोषात आणि ढोलताशांच्या गजरात मंगळवारी सायंकाळी कुडाळ येथील सिंधुदुर्गचा राजा गणपतीच्या विसर्जन मिरवणूकीला सुरूवात झाली. पावशी तलावात रात्री सिंधुदुर्ग राजाचे विसर्जन करण्यात आले.
दरवर्षी प्रमाणे आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानमार्फत कुडाळ येथे सिंधुदुर्गचा राजा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. २१ व्या दिवशी मंगळवारी दुपारी श्रींची पूजा आणि महाआरती करण्यात आली. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात सायंकाळी सिंधुदुर्गचा राजा दरबारातून विसर्जन मिरवणूकीला सुरूवात झाली. कुडाळ येथून पावशी तलावाच्या दिशेने विसर्जनासाठी सिंधुदुर्गचा राजा मिरवणूकीने मार्गस्थ झाला. यावेळी आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व संजू परब, जि. प. चे माजी अध्यक्ष संजय पडते, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, ओंकार तेली व अरविंद करलकर, तालुकाप्रमुख विनायक राणे व दीपक नारकर, भाजप तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, रूपेश कानडे, पप्या तवटे, सुनील बांदेकर, अभी गावडे, विलास कुडाळकर, चेतन पडते, प्रकाश मोर्ये, नागेश नेमळेकर, अनिकेत तेंडुलकर आदींसह पदाधिकारी – कार्यकर्ते, सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि गणेशभक्त या मिरवणुकीत सहभागी झाले होते. रात्री उशिरा पावशी तलावात सिंधुदुर्ग राजाचे विसर्जन करण्यात आले.





