कुंभारवाडी शाळेत शिक्षण घेऊनच मी नगरसेवकपदापर्यंत – उदय मांजरेकर

कुंभारवाडी शाळेचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात संपन्न
कुडाळ कुंभारवाडी शाळेत माझे शिक्षण झाले याचा मला सार्थ अभिमान आहे. म्हणूनच मी आज नगरसेवकपदापर्यंत पोहोचलो असे प्रतिपादन कुडाळ नगरपंचायत बांधकाम सभापती उदय मांजरेकर यांनी केले. कुंभारवाडी शाळेचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला त्यावेळी श्री. मांजरेकर बोलत होते.
कुडाळ कुंभार वाडी शाळेच्या माजी विद्यार्थी स्नेहमेळावा शाळेमध्ये श्री मांजरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी राजु गवंडे, राजु बक्षी, उदय बाणे, महेश राऊळ, पपु तोरसकर, रुपेश राऊळ, संजय कुंभार, कृष्णा घाडी आदी व्यासपीठावर उपस्थित होते
यावेळी बोलताना श्री. मांजरेकर म्हणाले कि, माजी विद्यार्थी मेळावा ही संकल्पना शिक्षकांची असल्याने त्या मागे शाळेच्या भवितव्यासाठी विचार होत असतात. या शाळेचा जमिन प्रश्न आहे तो आम्ही सर्व ग्रामस्थ, जमिन मालक, पालक यांच्या सहकार्याने सोडवू. यासाठी प्रयत्नही सुरु असल्याचे श्री. मांजरेकर यांनी सांगितले.
युवा नेते राजु गवंडे, राजु बक्षी यांनीही विचार मांडले. यावेळी दाजी कुंभार, श्री. पवार, श्रीम. स्मिता परब, दीपाली गावडे, श्रीम. शबनम शेख, श्री. तोरसकर सर, श्रीम. चैत्राली पाटील, श्री. उमेश घाडी, कु. आरोही पंडित, शिक्षीका श्रीम. स्वप्नाली सावंत, मुख्याध्यापीका श्रीम. सायली कदम, ऋतुजा गावडे, स्वराली लाड, अश्विनी सावंत, गौरी गोसावी, गुरुप्रसाद सावंत, दीपाली मोहीते आदी उपस्थित होते.





