राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष श्री.अबिद नाईक यांनी घेतले कणकवलीच्या राजाचे दर्शन.

कणकवली/प्रतिनिधी कणकवली ऑटो रिक्षा चालक-मालक,सार्वजनिक गणेशोत्सव कला क्रीडा मंडळ,कणकवली यांच्यावतीने नवसाला पावणारा “कणकवलीचा राजा” या गणपती गजाननाची प्राणप्रतिष्ठापना करून दरवर्षी मोठ्या उत्सवात हा गणेशोत्सव साजरा केला जातो.प्रतिवर्षाप्रमाणे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष श्री.अबिद नाईक यांनी नुकतेच या कणकवलीच्या राजाचे दर्शन घेतले असून गुलछडींनी भरगच्च भरलेला सुहासी मोठा हार गणपती चरणी अर्पण केला.यावेळी गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष बाळा वराडकर यांनी श्री.अबिद नाईक यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले तसेच आदरयुक्त सन्मान केला.गणपती गजाननाची पूजा-अर्चा,आरती करून कणकवलीतील नागरिकांच्या सुख समाधानासाठी तसेच निरोगी आणि उदंड आयुष्यासाठी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष श्री.अबित नाईक यांनी गणपती गजाननाकडे साकडे घातले.तसेच तीर्थप्रसादाचा लाभ देखील घेतला.तदनंतर गणेश उत्सव मंडळाला आवश्यक असलेल्या सेवा-सुविधा तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवर गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अबिद नाईक यांच्यासोबत चर्चा केली.
प्रसंगी गणेश उत्सव समितीचे अध्यक्ष बाळा वराडकर,उत्सव समितीचे संचालक आणि शहर रिक्षा संघटना अध्यक्ष संतोष सावंत, रिक्षा संघटना जिल्हा कार्य उपाध्यक्ष महेश आंबडोस्कर,प्रसिद्ध निवेदक बाळू वालावलकर,सेक्रेटरी मनोज वारे,उदय मोर्ये तसेच इतर रिक्षा चालक-मालक उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष श्री.अबिद नाईक यांच्यासोबत जिल्हा उपाध्यक्ष बाबू सावंत,शहर अध्यक्ष इम्राण शेख,युवक जिल्हाध्यक्ष निशिकांत कडुलकर,शहर उपाध्यक्ष गणेश चौगुले,शहर सरचिटणीस विशाल पेडणेकर आदी कार्यकर्त्यानी कणकवलीच्या राजाचे दर्शन घेतले.

error: Content is protected !!